अहमदनगर : एकीकडे आज देशभरात लाडक्या गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जात आहे. तर दुसरीकडे अहमदनगर येथील पोलीस (Ahmednagar Police) दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे (Dnyaneshwar More) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल दुपारी तोफखाना पोलीस स्टेशनच्या (Tofkhana Police Station) गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) मिरवणुकीत त्यांनी डान्स केला होता. मिरवणूक संपून घरी जाताच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. 


हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ज्ञानेश्वर मोरे यांचा मृत्यू 


या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी गेले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. 


नाशिकला दुर्घटना टळली


गोदावरी नदी परिसरात गोदा महाआरती कार्यक्रमासाठी आलेला 50 वर्षीय व्यक्ती गोदावरी नदीत पडला. त्यालां मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले. रवींद्र ठाकरे (50) हे पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीत पडले होते. याबाबत मनपा अग्निशमन विभागाला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्यात उद्या टाकल्या. आपल्या जीवाची बाजी लावून कर्मचाऱ्यांनी पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. रवींद्र ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ahmednagar Crime News : अहमदनगरमध्ये भरदिवसा कांदा व्यापाऱ्यावर हल्ला, 50 लाखांची रोकड लुटून दरोडेखोर फरार, शहरात खळबळ


Mumbai Ganesh Visarjan 2024: मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती