Ganesh Jayanti 2023 : भगवान श्रीगणेशाचा (Lord Shri Ganesha) जन्मोत्सव दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच विनायक चतुर्थीला साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, पार्वतीचा पुत्र गणेशाचा या तिथीला जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असेही म्हटले जाते.



संततीसुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते
असे म्हणतात की, विघ्नहर्ता गणेशाच्या जयंती दिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संततीसुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते, तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या, दुःखापासून मुक्ती मिळते. बुध-केतूच्या पीडातून मुक्ती मिळते. यंदा गणेश जयंती 25 जानेवारी 2023 ला म्हणजेच आज आहे. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करायचे असेल तर शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि गणपती पूजेचे नियम जाणून घेऊया.



गणेश जयंती 2023 रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तिथी 25 जानेवारीला दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बुधवार 25 जानेवारीला रात्री 12.34 मिनिटांपर्यंत संपेल. मात्र, उदय तिथीनुसार गणेश जयंती 25 जानेवारी बुधवारी आहे. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते 12.34 आणि रवियोग बुधवारीच सकाळी 06.44 ते 08.05 पर्यंत असेल. परीघ योग 24 जानेवारी रोजी रात्री 9.36 ते 25 जानेवारी सायंकाळी 6.15 पर्यंत असेल. शिवयोग 25 जानेवारीच्या संध्याकाळी 6.15 ते 26 जानेवारीला सकाळी 10.28 पर्यंत असेल.



गणेश जयंती पूजा विधी


-गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे आणि लाल वस्त्र परिधान करून गणपतीसमोर उपवासाचे व्रत करावे.
-ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवा आणि त्यावर लाल कपडा पसरवा. कलश स्थापित करा.
-आता गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे
-नंतर अस्य प्राण प्रतिषठन्तु अस्य प्राणा: क्षरंतु च। श्री गणपते त्वम सुप्रतिष्ठ वरदे भवेताम।। या मंत्राचा जप करताना पदावर गणपतीची स्थापना करा.
-गौरीपुत्र गणेशाला कुंकू, हळद, शेंदूर, अक्षता, चंदन, अबीर, गुलाल, अष्टगंध, मेहंदी, लाल फूल, लवंग, वेलची, अत्तर, सुपारी, कापड, नारळ अर्पण करा.
-आता पवित्र धाग्यात थोडी हळद टाकून ती गणपतीला घालावी आणि 'श्री गणेशाय नमः दुर्वाकुरान समर्पयामि।. मंत्राचा उच्चार करताना 11 किंवा 21 दुर्वा जोडून अर्पण करा.
-गणपतीला त्याची आवडती पाच फळे (केळी, सीताफळ, जांभूळ, पेरू, बेल) अर्पण करा. प्रसादात तुळस ठेवू नये याची काळजी घ्या, गणपतीच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य आहे.
-सुगंधित उदबत्ती आणि तीन दिवे लावून गणपती चालीसा पाठ करा आणि गणेश जयंतीची कथा वाचा.
-कुटुंबासह गणपतीची आरती करावी आणि नंतर सर्वांना प्रसाद वाटावा. या दिवशी गाईला तिळाचे अन्न खाऊ घालावे आणि तिळाचे दान करणेही उत्तम.



गणेश जयंतीला हे काम करू नका (गणेश जयंती पूजा नियम)


-गणेश जयंतीला गणपतीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर करू नका. पौराणिक मान्यतेनुसार गणपतीने तुळशीला शाप दिला होता.
-बाप्पाच्या पूजेत सुकी फुले, केतकीचे फूल, पांढऱ्या रंगाच्या वस्तू (पांढरे जानवं, पांढरे चंदन, पांढरे वस्त्र), तुटलेल्या अक्षता यांचा वापर करण्यास मनाई आहे.
-गणेश जयंतीच्या दिवशी चुकूनही कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. यामुळे केतूचे अशुभ परिणाम मिळतात. यासोबतच बोलण्यात दोष असल्याचे दिसून येते.



गणेश जयंती 2023 मुहूर्त
माघ शुक्ल विनायक चतुर्थी तिथी सुरूवात - 24 जानेवारी 2023, दुपारी 03.22
माघ शुक्ल विनायक चतुर्थी तिथी समाप्त - 25 जानेवारी 2023, दुपारी 12.34 वा.
उदय तिथीनुसार गणेश जयंती 25 जानेवारी 2023 बुधवारी आहे.


गणेश जयंती पूजेची वेळ - सकाळी 11.34 ते दुपारी 12.34 (25 जानेवारी 2023)
रवि योग - सकाळी 06.44 - 08.05 (25 जानेवारी 2023)


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Yearly Horoscope 2023: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष? जाणून घ्या तुमचे वार्षिक राशीभविष्य