Ganesh Chaturthi 2022: दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा हा सण 31 ऑगस्टला साजरा होणार आहे. गणेश उत्सव 10 दिवस साजरा केला जातो. भगवान गणेश हे सर्व देवतांमध्ये प्रथम पूज्य देवता मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही तुमचे नशीब उजळवू शकता. त्यांच्या प्रभावाने श्री गणेशाची कृपा प्राप्त होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊया 


गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय


-गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ अवश्य करावा.


-शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारिक साधन म्हणून केले आहे. चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना विशेष फलदायी असते. घरामध्ये या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही.


-जर तुम्हाला बर्याच काळापासून कोणत्याही समस्येने त्रास होत असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. श्री गणेशाच्या मंदिराला भेट द्या आणि त्याला प्रार्थना करा. हत्तीला हिरवा चारा दिल्यास या समस्या लवकर संपतात.


-पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गूळ आणि शुद्ध तूप अर्पण करावे. यानंतर या भोगाचा नैवेद्य गायीला खाऊ घाला. या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.


-कोणत्याही मनोकामना पूर्ण होण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाच्या मंदिरात जाऊन गुळाच्या २१ गोळ्या कराव्यात आणि दुर्वा अर्पण कराव्यात. असे केल्याने कोणतीही इच्छा लवकर पूर्ण होते.


-वैवाहिक जीवनात अडचणी आल्यास गणेश चतुर्थीचे व्रत ठेवा आणि बाप्पाला मालपुवा अर्पण करा. यामुळे लवकरच विवाह होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे देखील शुभ आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या


Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत


Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय