Festivals In March 2024 : इंग्रजी कॅलेंडरचा तिसरा महिना, म्हणजेच मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात फाल्गुन आणि चैत्र या मराठी महिन्यांचा संगम आहे. त्यामुळे या महिन्याच अनेक महत्त्वाचे भारतीय सण-उत्सव आणि व्रत येणार आहेत. मार्च महिन्यात महाशिवरात्री (Mahashivratri 2024), होळी, चैत्र नवरात्री, गुड फ्रायडे, गुढी पाडवा आणि अमलकी एकादशी , इस्टर संडे या सारखे अनेक सण येणार आहेत. 


मार्च महिन्यात दोन एकादशी येणार असून, शेवटच्या आठवड्यात होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी सारखे सण साजरे केले जाणार आहे. तसेच  विनायकी आणि संकष्ट चतुर्थीही येत आहे. यासोबतच रमजानचा पवित्र महिनाही मार्च महिन्यातच सुरू होत आहे. यासोबतच अनेक महान व्यक्तींच्या जयंतीही याच महिन्यात येतात, त्यामुळे मार्च महिन्याचं विशेष महत्त्व आहे. मार्च महिन्यातील सर्व सण-उत्सव जाणून घेण्यासाठी मार्च महिन्याच्या फेस्टिव्हल कॅलेंडरवर एक नजर टाकूया.


मार्च महिन्यात असलेले महत्त्वाचे सण-उत्सव


गजानन महाराज प्रकटदिन : 3 मार्च रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. शेगावसह देश-विदेशात हा दिवस मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो.


रामदास नवमी : 5 मार्च रोजी दासनवमी आहे. या दिवशी शक्ती, भक्ती आणि युक्ती याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी देह ठेवला, ती तिथी दासनवमी म्हणून ओळखली जाते. 


विजया स्मार्त एकादशी, भागवत एकादशी : 7 मार्च रोजी विजया स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी आहे. एकादशीला श्रीविष्णूंचे पूजन, नामस्मरण करणे उत्तम मानले जाते. 


महाशिवरात्री, प्रदोष व्रत : 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी शंकराची उपासना करणे अतिशय पुण्याचे आणि फलदायी समजले जाते. 8 मार्चला प्रदोष व्रत देखील आहे.


माघ अमावास्या : 10 मार्च रोजी माघ महिन्याची अमावास्या आहे. तसेच 10 मार्च रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन देखील आहे. 


रमजान मासारंभ : रमजानचा पवित्र महिना सोमवार, 11 मार्चपासून सुरू होईल आणि तो बुधवारी, 10 एप्रिल रोजी संपेल अशी शक्यता आहे.


विनायक चतुर्थी : 13 मार्च रोजी विनायक चतुर्थी आहे. हा दिवस गणपतीच्या पूजनासाठी, नामस्मरणासाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक मानला जातो.


दुर्गाष्टमी : 17 मार्च रोजी मासिक दुर्गाष्टमी आहे, या दिवशी देवीची मनोभावे पूजा केली जाते. 


आमलकी एकादशी : 20 मार्च रोजी आमलकी एकादशी आहे. ही फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी आहे. या दिवशी विषुवदिन देखील आहे. 


होळी : 24 मार्च रोजी होळी आहे, तर 25 मार्च रोजी धुलिवंदन आहे. 26 मार्चपासून वसंतोत्सवारंभ आहे. 


संत तुकाराम बीजोत्सव : 27 मार्च रोजी संत तुकाराम बीजोत्सव आहे. 


संकष्ट चतुर्थी : 28 मार्च रोजी मराठी वर्षातील शेवटची फाल्गुन संकष्ट चतुर्थी आहे.


गुड फ्रायडे : 29 मार्च रोजी गुड फ्रायडे आहे.


रंगपंचमी : 30 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल.


संत एकनाथ षष्ठी, ईस्टर संडे : 31 मार्च रोजी संत एकनाथ षष्ठी आहे. संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली, तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. तसेच या दिवशी ईस्टर संडे देखील आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Rahu Transit : राहू ग्रहाने आपली चाल बदलली; 'या' 3 राशींना 2025 पर्यंत राहावं लागणार सांभाळून, बसणार आर्थिक फटका