Falgun Vinayak Chaturthi 2023 : विघ्नहर्ता, सुखकर्ता श्रीगणेशाची (Lord Ganesh) आज फाल्गुन विनायक चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा केल्याने मानवाला सुख-समृद्धी, आर्थिक प्रगती, ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे म्हणतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार, या व्रताच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात अडथळे, राहू-केतूचे दोष नष्ट होतात, हे व्रत केल्याने पतीचे दीर्घायुष्य आणि संततीसुख प्राप्त होते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध आहे. तर गणपतीला सिंदूर अत्यंत प्रिय का आहे?  जाणून घ्या विनायक चतुर्थीनिमित्त महत्वाच्या गोष्टी



विनायक चतुर्थीला चार योगांचा संयोग
यावर्षी विनायक चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी, शुभ योग, शुक्ल योग आणि रवि योग यांचा संयोग होत आहे. या शुभ योगात साधकाला गणपतीची पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते. गणपतीची पूजा करताना काही खबरदारी घ्यायलाच हवी असे म्हणतात. जाणून घ्या विनायक चतुर्थीच्या पूजेची पद्धत, उपाय.


 


गणपतीला सिंदूर अत्यंत प्रिय का आहे?


फाल्गुन विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून शुभ मुहूर्तावर गणपती मूर्तीला पाटावर बसवावे. 
शास्त्रानुसार गणपतीला सिंदूर अतिशय प्रिय आहे. 
शिवपुराणानुसार श्रीगणेशाने सिंदुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. ज्याच्या रक्तातही सिंदूर होता. 
त्याला मारल्यानंतर श्री गणेशाने त्याचे रक्त त्याच्या अंगावर लावले, तेव्हापासून गणेशाला सिंदूर अर्पण केला जातो. 
विनायक चतुर्थीला गणपतीला सिंदूर अर्पण केल्याने सर्व अडथळे दूर होतात असे म्हणतात. 
या दिवशी भगवान विनायकाला कपाळावर सिंदूर अर्पण केल्यानंतर संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे. 
यानंतर गणेशाला लाडू अर्पण करा. त्यानंतर आरती करून ब्राह्मणांना प्रसाद वाटप करावा.


 


फाल्गुन विनायक चतुर्थी 2023 मुहूर्त


फाल्गुन शुक्ल चतुर्थी तिथी सुरू कधी होते - 23 फेब्रुवारी 2023, पहाटे 03.24
फाल्गुन शुक्ल विनायक चतुर्थी तारीख समाप्ती - 24 फेब्रुवारी 2023, पहाटे 01.33


गणपती पूजेसाठी मुहूर्त - सकाळी 11.32 - दुपारी 01.49 वाजेपर्यंत (23 फेब्रुवारी 2023)


 


फाल्गुन विनायक चतुर्थीसाठी उपाय


फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थीच्या दिवशी दुर्वाच्या माळा करून गणपतीला अर्पण करा. यावेळी विघ्नहर्त्याला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा, त्यानंतर  वक्रतुण्डाय हुं" या मंत्राचा 54 वेळा जप करा. पूजा संपल्यानंतर हा गूळ आणि तूप गायीला खाऊ घाला. हे उपाय सलग पाच विनायक चतुर्थीला करा. असे मानले जाते की, असे केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही.


 


विनायक चतुर्थी पूजा साहित्य


गणेशमूर्ती, लाकडी पाट, लाल कापड, कलश
नारळ, सुपारी, पाच फळ, तूप, मोदक, कापूर, सिंदूर
रांगोळी, अक्षता, जानवं, गंगाजल, दुर्वा
वेलची, लवंग, पंचामृत


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Falgun Vinayak Chaturthi 2023: फाल्गुन विनायक चतुर्थीच्या दिवशी 4 अद्भुत योग, गणेशाची होईल कृपा! फक्त करा हे 3 काम