Dussehra 2022 Shubh Yog: दसऱ्याला बनतोय शुभ योग! या राशींना होईल करिअर आणि व्यवसायात लाभ
Dussehra 2022 Shubh Yog: यंदा दसऱ्याला येणारे शुभ योग आणखीनच खास बनवत आहेत. या योगांमध्ये पूजा आणि शुभ कार्य केल्याने खूप फायदा होतो.
Dussehra 2022 Shubh Yog : शारदीय नवरात्रीच्या (Navratri 2022) 9 दिवसांनंतर, दसरा म्हणजेच विजयादशमी (Dusshera 2022) उत्सव साजरा केला जातो. या दिवशी वाईटाचे प्रतीक रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. त्याच वेळी, हिंदू पौराणिक कथेनुसार, हा सण देवी दुर्गेचा महिषासुरावर विजय मिळवण्याचा दिवस आहे. नवनवीन काम सुरू करण्यासाठी, खरेदीसाठी, वाहनांची आणि शस्त्रांची पूजा करण्यासाठी दसरा अत्यंत शुभ मानला जातो. यंदा दसऱ्याला येणारे शुभ योग आणखीनच खास बनवत आहेत. या योगांमध्ये पूजा आणि शुभ कार्य केल्याने खूप फायदा होतो.
दसरा 2022 शुभ मुहूर्त, खास योग
पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. या वर्षी अश्विन महिन्यातील दशमी तिथी 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 02.21 पासून सुरू होऊन 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असेल. उदयतिथीच्या आधारे 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी केली जाईल. या दिवशी विजय, अमृतकाळ आणि दुर्मुहूर्त असे शुभ योग तयार होत आहेत. हे शुभ योग ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जातात. दसऱ्याच्या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यामुळे छत्र योग तयार होतोय. जो खूप लाभदायक आहे. हे शुभ योग ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जातात. पंचांगानुसार विजयादशमी किंवा दसऱ्याला श्रवण नक्षत्र असणे अत्यंत शुभ असते, जे रात्री 9.14 पर्यंत राहील. दुपारी दसरा पूजन तर सायंकाळी रावण दहन होणार आहे. या काळात या राशींना करिअर आणि नोकरीत यश मिळण्याचे योग आहेत.
या राशींना करिअर आणि नोकरीत यश मिळण्याचे योग
धनु : मालमत्तेशी संबंधित लोकांना हा महिना लाभ देईल. तुमच्या मालमत्तेत नफा आणि उत्पन्नात वाढ होईल. जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी ऑक्टोबर महिना लाभदायक ठरेल.
कुंभ : या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कमी कष्टातही जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. ऑक्टोबर महिना आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात अनपेक्षित फायदा होऊ शकतो. परदेशातून पैसा येण्याची शक्यता आहे.
सिंह : आर्थिक दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी शुभ राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढेल. वैयक्तिक प्रयत्नातूनही आर्थिक प्रगती होऊ शकते.
मेष : या राशीच्या लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीमध्ये उत्पन्नाची जोरदार शक्यता आहे. मात्र, या महिन्यात तुमच्या खर्चातही वाढ होईल. परदेशाशी संबंधित कोणताही व्यवसाय तुमचे उत्पन्न वाढवेल.
दसऱ्याच्या दिवशी ही शुभ कर्मे आणि उपाय करा
दसऱ्याच्या दिवशी ज्योतिष आणि धर्मात सांगितलेले काही शुभ कार्य करा. हे विशेष काम केल्याने जीवनात खूप आनंद आणि समृद्धी येते.
दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी. तसेच दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते आणि प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात.
शत्रूंवर विजय मिळवायचा असेल तर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करा.
नोकरी-व्यवसायात प्रगती करायची असेल तर दसऱ्याच्या दिवशी 'ओम विजयाय नमः' या मंत्राचा जप करावा. यानंतर देवी दुर्गाला 10 फळे अर्पण करा. तसेच झाडू खरेदी करून मंदिरात दान करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती देते.
दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला कुंकू किंवा लाल रंगाच्या फुलांनी अष्टकमलचा आकार बनवावा. तसेच देवी लक्ष्मीला धन देण्याची प्रार्थना करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय