Daughter Marriage : मुलीच्या लग्नानंतर प्रत्येक आई-वडिलांना काळजी असते की मुलगी सासरी सुखी राहिल का? सासरच्या मंडळींची मने जिंकू शकेल का? माहेरच्या घरी मिळालेले सुख मुलीला सासरी मिळेल की नाही? परंतु, मुलीला लग्नानंतर सासरी पाठवताना काही उपाय केले तर मुलगी आयुष्यभर सुखी राहील.  



  • लग्नानंतर मुलीला निरोप देताना तिच्या ओटीत हळदीच्या सात गुंठ्या ठेवाव्यात. सासरच्या घरी गेल्यावर  ही हळद पिवळ्या कपड्यात बांधून कपाटात ठेवा. असे केल्याने मुलीला सासरच्या घरात खूप प्रेम मिळू लागते.

  • निरोप घेण्यापूर्वी आईने आपल्या सिंदूर पेटीतील सिंदुराने मुलीची भांग भरावी.  

  • मुलीला निरोप देताना तिच्यासोबत नारळ द्यावा. हा नारळ सासरच्या घरी सात दिवस ठेवा. सात दिवसांनी मुलीच्या हस्ते तो पाण्यात प्रवाहित करावा.

  • निरोपाच्या वेळी मुलीला चार तांब्याचे खिळे द्यावेत. मुलीने हे खिळे तिच्या पलंगाच्या चार पायात घालावेत. हा उपाय केल्याने मुलीच्या सासरच्या घरी सुख मिळेल. 

  • एका भांड्यात पाणी भरा. या पाण्यात हळद आणि तांब्याचे नाणे टाका. हे पाणी मुलीच्या डोक्यावर 7 वेळा फिरवा. मग हे भांडं तिच्या हातात ठेवा. मुलगी निघून गेल्यानंतर या भांड्यात ठेवलेले पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. असे केल्याने मुलीला सासरच्या घरात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

  • लग्नाच्या एक दिवस आधी तुमच्या मुलीच्या हातातून मेहेंदी दान करा. मेहंदीच्या तीन पॅकेटपैकी एक पॅकेट काली माच्या मंदिरात अर्पण करा, मेहंदीचे दुसरे पॅकेट विवाहित महिलेला दान करा आणि तिसऱ्या पॅकेटमधून विवाहित महिलेला मेहंदी लावा. नंतर त्याच पॅकेटने मुलीच्या हातावर मेहंदी लावा. असे केल्याने मुलीला लग्नानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :