Vastu Tips For Wallet : पैसे ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ एक पर्स आणि पाकीट ठेवत असते. पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की अनेक लोक पैशांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी आपल्या पर्समध्ये ठेवतात, ज्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. लोकांच्या या सवयीमुळे त्यांच्यासाठी आर्थिक नुकसान होते आणि समृद्धी कमी होते. म्हणूनच पर्समधून काही वस्तू काढणे चांगले . या गोष्टींमुळे आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाच्या बाबतीतही त्रास सहन करावा लागतो. चला जाणून घेऊया आपल्या पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत.
या गोष्टी पर्समध्ये ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये पितरांचे चित्र ठेवणे शुभ मानले जात नाही. यामुळे पैशाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
पर्स कुठूनही फाटणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे आर्थिक जीवनात संकट निर्माण होते.
पर्समध्ये नोट कधीही फिरवून ठेवू नका. वास्तूनुसार असे करणे चांगले नाही.
पर्समध्ये जुनी बिले किंवा निरुपयोगी कागदपत्रे कधीही ठेवू नका. असे केल्याने नकारात्मकता घर करून जाते.
पर्समध्ये चावी कधीही ठेवू नका. वास्तूनुसार असे केल्याने पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो.
पर्स कधीही डोक्याजवळ ठेवू नये. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात.
पर्समध्ये देवाचे चित्र कधीही ठेवू नये, कारण आपण पर्स कुठेही ठेवतो आणि घाणेरड्या हातांनी स्पर्श करतो. असे केल्याने देवतांचा अपमान होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
हेही वाचा :