England ODI Captain : इंग्लंड क्रिकेटने(England Cricket) संघाचा नवा व्हाईट बॉल कॅप्टन अर्थात मर्यादीत षटकांचा कर्णधार म्हणून जोस बटलर (Jos Buttler) याचं नाव जाहीर केल्याची माहिती दिली आहे. इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan). नुकतीच  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Eoin Morgan Retirement) घेतली. ज्यानंतर बटलर याचच नाव चर्चेत होतं, त्यानुसार आता तोच इंग्लंडचा एकदिवसीय संघाचा कर्णधार असणार असून टी20ची जबाबदारीही त्याच्याकडेच असेल.


इयॉन मॉर्गन हा मागील काही काळापासून खराब कामगिरी करत होता, त्यानंतरच त्याने निवृत्तीची घोषणा केली. पण याउलट दुसरीकडे अफलातून कामगिरी सुरु ठेवणारा खेळाडू म्हणजे इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Joss Buttler). यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून तीन शतकं ठोकत ऑरेंज कॅप मिळवणारा बटलर अजूनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच त्याला इंग्लंडचा एकदिवसीय तसंच टी20 संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी मॅच झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड मर्यादीत षटकांचे टी20 आणि एकदिवसीय़ सामने खेळेल. यावेळी बटलर संघाचा कर्णधार असणार आहे.



कशी आहे बटलरची कारकिर्द?


जोस बटलर हा एक उत्तम दर्जाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. विशेष म्हणजे तो सलामीवीराचीच नाही तर फिनीशर ही भूमिकाही निभावू शकतो. कारकिर्दीचा विचार करता, बटलरने 57 कसोटी सामन्यातील 100 डावांत 2 हजार 907 रन केले आहेत. यात दोन शतकांसह 18 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 151 एकदिवसीय सामन्यांतील 125 डावांत 4 हजार 120 धावा बटलरने केली आहे. यामध्ये 10 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 88 टी20 सामन्यातील 80 डावांत त्याने 2 हजार 140 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतकासह 15 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्येही तो अफलातून खेळ करत असून 82 पैकी 81 डावांत त्याने 2 हजार 831 रन करत 5 शतकं आणि 15 अर्धशतकं ठोकली आहेत.


हे देखील वाचा-