Chanakya Niti : आचार्य चाणक्य लोकांना त्या गोष्टी सांगतात, ज्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहेत. यामुळेच शेकडो वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतिची लोकप्रियता आणि महत्त्व जराही कमी झालेले नाही. आजही मोठ्या संख्येने लोक चाणक्य नीतिचा अभ्यास करतात आणि त्यात लिहिलेल्या गोष्टींचे आचरण करतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जो कोणी या 5 गोष्टींचे पालन करतो, त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
या नियमांचे, सवयींचे पालन करणारे लोक कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतात. काय आहेत या चाणक्यंच्या ‘5’ अनमोल गोष्टी, जाणून घेऊया...
अपयशाला घाबरू नका : चाणक्य नीतिनुसार, एकदा तुम्ही कोणतेही काम सुरू केले की, तुम्हाला अपयशाची भीती वाटू नये. तसेच, या भीतीपोटी तुम्ही हातातले काम मध्येच सोडू नये. जे लोक नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करतात त्यांचा नक्की विजय होतो.
संधीचा पुरेपूर फायदा घ्या : चाणक्यंच्या या शिकवणीनुसार, व्यक्तीने योग्य संधी आल्यावर आपली प्रतिभा दाखवायला चुकू नये. संधी आल्यावर जे आळस करतात, असे लोक पुढे डोक्याला हात लावून बसतात आणि आयुष्यभर पश्चाताप करतात. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि तिचा फायदा करून घेण्यासाठी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जो व्यक्ती या गोष्टी ध्यानात ठेवतो, त्याला आयुष्यात अपयशाचे तोंड कधीच पाहावे लागत नाही.
नेहमी सत्य बोला : चाणक्य नीतिनुसार जे लोक खोटे बोलतात, त्यांनाच अपयश येते. कारण, खोटे बोलणे कोणालाही आवडत नाही. खोटे बोलून आपले काम करून घेणारा एक ना एक दिवस पकडला जातो. जेव्हा, लोकांना त्याचे सत्य कळते, तेव्हा त्याला मान झुकवावीच लागते. अशा लोकांचे भर समाजातही हसे होते.
प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका : चाणक्य नीतिनुसार, शिक्षकाकडून शिक्षण घेताना कधीही लाज वाटू नये. विद्यार्थ्याने शिक्षकाला प्रश्न करताना कधीही संकोच करू नये. जे विद्यार्थी शिक्षकांना मोकळेणाने प्रश्न विचारू शकत नाहीत, त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव कायम राहतो.
राग ही भावनाच सोडा : चाणक्य नीतिनुसार, माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा राग आहे. रागाने माणसाची चांगली विचारशक्ती नष्ट होते. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय नेहमीच चुकीचा असतो. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य!