Diwali Padwa 2022 : संपूर्ण भारतभर सध्या दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिजे जाते.  दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो. परंतु, यातील दिवाळी पाडव्याला खास महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण दिवाळी पाडव्याची ओळख आहे. या शूभ दिवळी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. याबरोबरच या दिवशी व्यापारी मंडळी आपल्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्या, शाईची दौत आणि लेखनसाहित्याची पूजा करतात. काही व्यापारी या दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात. यालाच विक्रमसंवत्सर म्हटले जाते. 


दर वर्षी लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. मात्र यंदाच्या वर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आले आहेत. 26 ऑक्टोबर म्हणजे उद्या दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्याची श्रद्धा आहे. 
 
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नी पतीला ओवाळाचे. त्यामुळे दोघांचे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे.  


 बलिप्रतिप्रदेची पूजा 


दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा (Balipratipada 2022) पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे. 


या  दिवशी काय करावे? 
कार्तिक शुक्ल प्रतिपदा या दिवशी जेवणात नेहमीच्या पदार्थांशिवाय इतर पदार्थ करुन त्यांचा श्रीकृष्णास नैवेद्य दाखवावा.  यादिवशी मिठाईच्या पदार्थांची देवापुढे रास उभारतात. शिवाय नातेवाईकांना या दिवशी घरी जेवायला बोलवण्याची पद्धत रूढ आहे.  


पाडव्याच्या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे. याबरोबरच एखाद्या मोठ्या कामाला देखील सुरूवात करावी. गादीवर तांदळाने बळीची आकृती काढून तिची पूजा करावी. यामुळे शेतकरी राजाला वर्ष सुखाचे जाते असे मानले जाते.  


शुभ मुहूर्त
वही पूजनासाठी 26 सकाळी 6:45 ते स.9:30 आणि सकाळी 11 ते दु.12:15 व दु.4:30 ते सायं.6 या ही वहीपूजनासाठी शूभ वेळ आहे. याबरोबरच सायंकाळी 7 : 40 ते रात्री  9:10 या वेळेत देकील वहीपूजन करू शकता.   


महत्वाच्या बातम्या


Diwali Padwa 2022 : नवरा-बायकोच्या अतूट प्रेमाचं नातं जपणारा दिवस म्हणजेच 'दिवाळी पाडवा'; 'ही' आहे खास परंपरा