Dhan Yog On Buddha Purnima : वैशाख पौर्णिमेचा दिवस हा बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2024) म्हणून साजरा केला जातो. यंदा बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2024) 23 मे रोजी साजरी केली जात आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असलेली शनीची स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. शनीने 6 मे रोजी नक्षत्र परिवर्तन करून पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला. शनी सध्या आपल्या स्वत:च्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत स्थित आहे.
आता तब्बल 200 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कित्येक वर्षांनी शनि (Shani) स्वतःच्या पूर्वभाद्रपद नक्षत्रात आहे, यामुळे 3 राशींच्या लोकांवर शनीचा शुभ प्रभाव आहे. या राशींचा सुवर्ण काळ येत्या काही दिवसांत सुरू होईल आणि शनीच्या कृपेने या राशी मालामाल होतील. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
'या' तीन राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू
वृषभ रास (Taurus)
अवघ्या काही दिवसांत वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होतील. या काळात त्यांचा आत्मविश्वास वाढेल. एखाद्याकडे अडकलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. तसेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना देखील यश मिळेल. व्यावसायिकांना पैसे कमावण्याच्या भरपूर संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत तुमची चांगली प्रगती होईल. खासगी जीवनाशी संबंधित कामं पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. यावेळी तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये आर्थिक लाभ मिळेल.
सिंह रास (Leo)
येत्या काळात सिंह राशीचे लोक व्यवसायात विशेष प्रगती करतील. या व्यतिरिक्त या राशीच्या लोक जे बेरोजगार आहेत, नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जे व्यावसायिक आहेत, ते त्यांच्या व्यवसायात या काळात चांगली कमाई करतील आणि या काळात त्यांच्या संपत्तीत चांगली वाढण्याची शक्यता आहे. त्यांची त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप प्रगती होईल आणि त्यांचा सन्मानही वाढेल. या राशीच्या लोकांचे त्यांच्या वडिलांशी चांगले संबंध राहतील, यामुळे त्यांना वडिलोपार्जित मालमत्ताही मिळू शकते.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींना येत्या काळात लाभाच्या संधी प्राप्त होतील. या काळात त्यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. पैशांची बचत झाल्याने त्यांना फायदा होईल आणि व्यवसायात मोठा नफा मिळेल. यावेळी गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. या व्यतिरिक्त प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगलं सामंजस्य राहील. यावेळी त्यांना त्यांच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :