Buddha Purnima 2024 : वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा (Buddha Pournima 2024) साजरी केली जाते. हा दिवस बुद्ध जयंती (Buddha Jayanti 2024) म्हणून देखील साजरा केला जातो, या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला.


हिंदू धर्मात गौतम बुद्धांना भगवान विष्णूचा अवतार मानलं जातं. गौतम बुद्धांनी जगाला उदात्त सत्याचा उपदेश केला. बौद्ध धर्माचे लोक बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचं पालन करण्याची शपथ घेतात. यावर्षी 23 मे रोजी गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जात आहे. या खास प्रसंगी गौतम बुद्धांच्या काही शिकवणी (Gautam Buddha Quotes) पाहूया, ज्या आत्मसात केल्यास तुमचं आयुष्य बदलू शकतं.


गौतम बुद्धांची शिकवण (Gautam Buddha Thoughts)


1. अज्ञानी माणसाशी कधीही वाद घालू नये, अज्ञानी माणूस बैलासारखा असतो, तो ज्ञानाने नाही तर आकाराने मोठा दिसतो.


2. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.


3. भूतकाळातील वाईट काळाची आठवण ठेवू नये, भविष्याची स्वप्नं पाहू नयेत, फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करावं.


4. संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो. हा स्वभाव दोन चांगले मित्र, प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो. यापासून दूर राहावं. कोणावरही विनाकारण संशय घेऊ नये.


5. कोणाचाही द्वेष आणि मत्सर बाळगून जीवनात आनंद मिळत नाही, मत्सर माणसाची मनःशांती नष्ट करतो.


6. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता, अथवा चिकटून राहता.


7. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा त्रास नक्की काय असतो याची पुरेपूर जाणीव असते.


8. जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्यही आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.


9. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.  


10. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो, त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल


11. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरूवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर करा.


12. कोणतीही अडचण असेल तर ती सोडवा अथवा सोडून द्या. त्या अडचणीसह राहू नका, त्याचा अधिक त्रास होईल.


हेही वाचा:


Buddha Purnima 2024 Wishes Images : बुद्ध पौर्णिमेच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; गौतम बुद्धांचे विचार ठेवा तेवत, पाठवा 'हे' फोटो!