Devshayani Ekadashi 2025 : देवशयनी एकादशीला सुरु होतो चातुर्मास! उपवास, पूजा आणि महत्त्वाचे नियम, जाणून घ्या

Devshayani Ekadashi 2025 : देवशयनी एकादशी, ज्याला आषाढी एकादशी किंवा महाएकादशी असेही म्हणतात. ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येते आणि खूप महत्वाची मानली जाते.

Continues below advertisement

Devshayani Ekadashi 2025 : हिंदू धर्मात देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) हा एक अतिशय खास उपवासाचा सण तसेच दिवस मानला जातो. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णू संपूर्ण 4 महिने झोपतात. भगवान विष्णू हे विश्वाचे तारणहार असल्याने, योग निद्रामध्ये गेल्यानंतर कोणतेही शुभ कार्य करणे हिंदू धर्मात निषिद्ध आहे. देवशयनी एकादशी 2025 मध्ये 6 जुलै, रविवार रोजी साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी देवशयनी एकादशीचे महत्त्व आणि त्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ते सविस्तर जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

देवशयनी एकादशीचे महत्व

देवशयनी एकादशी, ज्याला आषाढी एकादशी किंवा महाएकादशी असेही म्हणतात. ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येते आणि खूप महत्वाची मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेमध्ये जातात. या काळाला चातुर्मास म्हणतात.

महत्त्वाचे मुद्दे :

भगवान विष्णु योगनिद्रेत जातात :

देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णु क्षीरसागरात शेषनागावर झोपतात आणि ते कार्तिक शुद्ध एकादशी (प्रबोधिनी एकादशी) पर्यंत निद्रास्थितीत राहतात.

चातुर्मासाची सुरुवात :

याच दिवशी चातुर्मास सुरु होतो. या चार महिन्यांत (आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन) धार्मिक, आध्यात्मिक आणि सात्विक जीवन जगणे श्रेष्ठ मानले जाते.

विवाह, मुहूर्त थांबतात :

देव झोपलेले असतात म्हणून कोणतेही शुभ कार्य — विवाह, वास्तुशांती, मुंडन — या काळात केले जात नाहीत.

पंढरपूरची वारी :

या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठोबा दर्शनासाठी पायी वारी करतात. ही एक अद्वितीय आणि पवित्र परंपरा आहे.

उपवासाचे महत्व :

या दिवशी उपवास करून विष्णूची पूजा केली जाते. रात्री जागरण आणि हरिपाठ करणे पुण्यदायी मानले जाते.

देवशयनी एकादशीला काय करावे?

  • उपवास करा (निर्जळी किंवा फलाहार)
  • विष्णु किंवा विठोबा यांची पूजा करा
  • श्री विष्णु सहस्त्रनाम, हरिपाठ, भजन, कीर्तन
  • गीता, भागवत यांचे वाचन
  • गरिबांना अन्न, वस्त्र दान

ह्या एकादशीपासून तुमचे जीवन अधिक सात्विक, संयमित आणि आध्यात्मिक व्हावे हाच हेतू आहे.
“हरी बोल, विठ्ठल नाम घ्या!”

- डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :                  

Astrology : 'एकटा जीव सदाशिव'! 'या' 5 राशींच्या लोकांना नात्यात अडकायला भीती; सिंगल लाईफच यांच्यासाठी असते 'बेस्ट'

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola