Ashadhi Ekadshi 2025: या जगात भगवंतांची अनेक मंदिरं आणि मूर्ती आहेत, ज्यामध्ये आपल्याला भगवंतांच्या वेगवेगळ्या मुद्रा, वेगवेगळ्या लीला आणि विविध रूपे दिसतात. पण तुम्ही कधी देवाला कंबरेवर हात ठेवून एकाच विटेवर युगानुयुगे उभे असलेली मूर्ती पाहिली आहे का? जर नसेल, तर आज आम्ही तुम्हाला पंढरपूरच्या श्री हरी विठ्ठलाबाबत सांगत आहोत.. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर म्हणजेच पंढरीचा विठोबा यांना भगवान विठ्ठल आणि पांडुरंग म्हणूनही ओळखले जाते, विठोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे तसेच कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. पांडुरंग हे साक्षात विष्णूचे द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहेत. आज आपण जेव्हा पांडुरंगाच्या मनमोहक मूर्तीकडे पाहतो, तेव्हा आपलं भान हरपून बसतो. आजही पंढरीचा विठोबा एकाच विटेवर उभा आहे, काय आहे यामागील नेमकं रहस्य? जाणून घ्या...
28 युगांपासून विटेवर उभा पांडुरंग...
भगवान विठोबा गेल्या 28 युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. याचा संबंध भक्त पुंडलिकाशी आहे. आजही वारकरी त्याचा उल्लेख ” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.” असा करतात. सहाव्या शतकात महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पुंडलिक नावाच्या एका भक्ताचा जन्म झाला. पुंडलिकाची त्यांच्या आई - वडिलांवर आणि त्यांच्या इष्टदेव श्रीकृष्णावर अनन्य भक्ती होती. भक्त पुंडलिक हा एक अतिशय साधा, सरळ आणि सहज स्वभावाचा व्यक्ती होता, श्रीकृष्णाला त्याचा हा स्वभाव खूप आवडला. एके दिवशी श्रीकृष्ण तयार झाले आणि कुठेतरी जाऊ लागले. त्याला जाताना पाहून रुक्मिणीजींनी त्याला विचारले. भगवानांनी उत्तर दिले की ते एका भक्ताला भेटण्यासाठी पृथ्वीवर जात आहे.
पुंडलिकने भगवानांना एका विटेवर उभे राहण्यास सांगितले तेव्हा,
हे ऐकून देवी रुक्मिणीलाही भगवंतांसोबत जाण्याची इच्छा झाली. आणि ते दोघेही त्या भक्त पुंडलिकाच्या दाराशी प्रकट झाले आणि म्हणाले, "पुंडलिक! बघ बाळा, आम्ही तुला रुक्मिणीजींसोबत भेटायला आलो आहोत.' त्यावेळी पुंडलिक आपल्या वडिलांची सेवा करत होता आणि तो भगवानांना म्हणाला, "हे भगवान! मी सध्या माझ्या वडिलांची सेवा करत आहे, म्हणून तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल, तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहून वाट पाहा. आई-वडिलांच्या सेवेसमोर पुंडलिकाने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट भगवंताकडे फेकली, त्यानंतर पुंडलिक पुन्हा आपल्या वडिलांच्या सेवेत मग्न झाला. हे ऐकून रुक्मिणीजींनाही आश्चर्य वाटले. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली.
भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले...
भगवानांनी मूर्तीचे रूप धारण केले होते. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात.. आणि विटेवर उभे राहिल्यामुळेच भगवान विठ्ठल हे नाव पडले. आजही आषाढ एकादशीच्या दिवशी लाखो भाविक भगवान विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी तीर्थयात्रेला जातात.
विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत...
विठोबा गेली 28 युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने विट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख ” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.” असा करतात. आषाढी एकादशी यंदा 6 जुलै 2025 रोजी आहे. या निमित्त दरवर्षी आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. देहू तसेच आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात आलेले भाविक भीमा (चंद्रभागा) नदीमध्ये स्नान करतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.
हेही वाचा :
Angarak Yog 2025: आतापर्यंत सोसलं..28 जुलैपर्यंत 'या' 4 राशींनी धीर धरा! मंगळ-केतूच्या अंगारक योगामुळे अनेकांचा भीतीने थरकाप..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)