Chaturmas 2024 : हिंदू पंचांगानुसार, सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेतत जातात. 


हिंदू धर्मशास्त्रात, चातुर्मासाला फार महत्त्व आहे. या दरम्यान कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. 17 जुलैपासून (काल) चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. आता पुढचे 118 दिवसांपर्यंत म्हणजेच 12 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मासाचा हा काळ असणार आहे. या चार महिन्यांच्या काळात जरी शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी तुम्ही पूजा-पाठ करू शकता. मान्यतेनुसार, या कालावधीत हे 5 कार्य केल्याने तुमच्यावर धनसंकट येण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. 


चातुर्मासात चुकूनही 'या' गोष्टी करु नका



  • धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात साखरपुडा, लग्न, मुंज यांसारखे शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते. त्यामुळे ही कामे चुकूनही करू नका. जर तुम्ही या काळात शुभ कार्य केलं तर ते एकतर पूर्ण होत नाहीत किंवा त्यामध्ये अनेक अजचणी निर्माण होतात. 

  • ज्योतिष शास्त्रानुसार, या दरम्यान तामसिक आहारापासून दूर राहावे. या काळत कांदा, लसूण, मांस, अंडी यांचं सेवन करू नये. जर एखादी व्यक्ती याचं पालन करत नसेल तर त्यांच्या कुंडलीत दोष निर्माण होतो आणि नकारात्मक परिणाम होतो. 

  • याचबरोबर, चातुर्मासात चार महिने दही, लोणच्यासारखे यांसारख्या पदार्थांचं सेवन करू नये. तसेच, या दरम्यान आंबट, हिरव्या भाज्या, वांगी, मुळा यांचंदेखील सेवन करू नये. 

  • ज्योतिष शास्त्रानुसार, चातुर्मासाच्या काळात खोदकाम करण्यास देखील मनाई केली जाते. यासाठी चातुर्मासाच्या दरम्यान भूमी पूजन किंवा हवन करून नये. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : पुढचे तब्बल 254 दिवस 'या' 3 राशी राहतील हॅप्पी-हॅप्पी; शनीचं कुंभ राशीत संक्रमण देणार मोठ्ठं सरप्राईज