Chaturmas 2022 : चातुर्मासला हिंदू धर्मातील धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, चातुर्मास  10 जुलैपासून सुरू झाला आहे आणि तो 4 नोव्हेंबर 2022 रोजी संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मासमध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या राशीत बदल होईल. या राशीच्या लोकांना त्यांच्या राशी बदलामुळे खूप त्रास होऊ शकतो. या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चातुर्मासात भगवान महावेवाचे उपाय केल्याने त्रास दूर होईल. 


वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना चातुर्मासात सावध राहावे लागेल. कारण नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ शुभ नाही. त्यामुळे नुकसान होऊ शकते, वाद टाळा.


मिथुन : मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक संकट येऊ शकते . वाहन चालवताना किंवा प्रवास करताना काळजी घ्या.



कर्क : कर्क राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन त्रासदायक असू शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. याबाबत काळजी घ्या.


वृश्चिक : नवीन काम सुरू करायचे असल्यास काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल, पण जॉइन करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.  


कुंभ : चातुर्मासात धनहानी होऊ शकते. वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. दुखापतीचे योग आहेत.


हे उपाय करा


चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळा आणि एकदाच जेवा. 
चातुर्मासात दररोज सकाळ संध्याकाळ भगवान शिवासोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी. यामुळे सर्व ग्रहांचा प्रभाव संपुष्टात येईल.
चातुर्मासात पाच प्रकारचे दान करावे. असे मानले जाते की हे कार्य केल्याने रखडलेले पैसे परत मिळतात आणि कर्जाची समस्या देखील दूर होते.  अन्नदान, वस्त्र दान, दीपदान, श्रमदान, सावली दान केल्याने अनेक समस्या दूर होतात. 
चातुर्मासात हरभरा आणि गुळाचे दान केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते.
चातुर्मासात कोणत्याही मंदिरात कापूर दान केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :