एक्स्प्लोर

Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहणाचा काऊंटडाऊन सुरु! मेषपासून ते मीन राशीपर्यंत 12 राशींवर नेमका कसा होणार परिणाम? वाचा ज्योतिषशास्त्र...

Chandra Grahan 2026 : आज चंद्रग्रहण ब्लड मूनसारखं दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे मेषपासून ते मीन राशीवर या चंद्रग्रहणाचा कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

Chandra Grahan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2026) लागणार आहे. या ग्रहणकाळाची सुरुवात दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपासून सुरु झाली आहे. मात्र, सूतक काळ सकाळपासूनच सुरु झाला आहे. या सूतक काळाचा प्रभाव चंद्रग्रहण संपेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. 

आज चंद्रग्रहण ब्लड मूनसारखं दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे मेषपासून ते मीन राशीवर या चंद्रग्रहणाचा कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

ग्रहणाच्या युतीने कोणते योग जुळून येणार आहेत? 

चंद्रग्रहण लागल्याने कुंभ राशीत सूर्य-बुधाची युतीने बुधादित्य योग जुळून येणार आहे. सूर्य-मंगळ ग्रहाच्या युतीने आदित्य मंगळ राजयोग जुळून येणार आहे. तसेच, चंद्र आणि केतूच्या युतीने सिंह राशीत ग्रहण दोष लागणार आहे. हा योग फार अशुभ मानला जातो. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा शुभ परिणाम नसणार. या काळात तुमच्या कुटुंबात अशांतीचं वातावरण निर्माण होईल. तसेच, वादविवाद देखील होऊ शकतात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी हे चंद्रग्रहण शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगले लाभ मिळतील. मात्र, तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी हे चंद्रग्रहण सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अनावश्यकपणे वाढ होऊ शकते. तसेच चुकीचे निर्णय घेतल्यामुळे तुमचं नुकसान देखील होऊ शकतं. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी हे चंद्रग्रहण शुभकारक नसणार आहे. या काळात तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. पैशांची कमतरता भासू शकते. तसेच, निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी हे चंद्रग्रहण शुभकारक नसणार आहे. या काळात तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. घरातील वातावरण बिघडू शकतं. तसेच, आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी चंद्रग्रहण सर्वसामान्य असणार आहे. या ाकळात तुमच्या वेतनात वाढ झालेली दिसेल. मात्र, कौटुंबिक जीवनात तणावाचं वातावरण पाहायला मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा चंद्रग्रहणाचा काळ सामान्य असणार आहे. या काळात उत्पन्नाच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तसेच, नवीन प्रॉपर्टी विकत घेण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचं चंद्रग्रहण सामान्य असणार आहे. या काळात व्यवसायाच्या बाबतीत तुमची प्रगती होऊ शकते. मात्र, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी चंद्रग्रहण शुभकारक नसणार आहे. आज तुम्हाला तुमची नियमित कामे पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, भौतिक सुख संपत्तीचा लाभ कमी मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा काळ सर्वसामान्य असणार आहे. या काळात वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. तसेच, धनहानी होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी हे चंद्रग्रहण शुभकारक नसणार आहे. या काळात कोणत्याही गोष्टीची रिस्क घेऊ नका. तसेच, लग्नाशी संबंधित गोष्टीत तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तसेच, तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचं चंद्रग्रहण लाभदायी नसणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये किंवा आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. पैशांची देवाण-घेवाण करताना सावधानता बाळगा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Chandra Grahan 2026 : आज संध्याकाळी चंद्रग्रहणात दिसणार 'ब्लड मून'; या 4 राशींवर सर्वात जास्त परिणाम, दु:खाचा डोंगर कोसळणार?

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 August 2026 : आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget