Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) लागणार आहे. हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत लागणार आहे. या चंद्रग्रहणाची सुरुवात भारतीय वेळेनुसार, रात्री 9 वाजून 57 मिनिटांपासून होणार आहे. तर, रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी होईल. हे चंद्रग्रहण भारतातदेखील लागणार आहे. त्यामुळे भारतात देखील याचा सूतक काळ मान्य असणार आहे. 

चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधीपासूनच सुरु होणार आहे. चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12 वाजून 58 मिनिटांनी सुरु होणार आहे. मान्यतेनुसार, या दरम्यान गर्भवती महिलांना कोणतंही कार्य करण्यास सांगितलं जात नाही. कारण यामुळे बाळाच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र, शास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काही काम करणं गरजेचं आहे. जेणेकरुन, बाळावर नकारात्मक परिणाम होणार नाही.  यासाठीच ग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावं ते जाणून घेऊयात. 

चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी 'ही' कार्य करावीत 

1. मंत्राचा जप आणि प्रार्थना (Mantra Jaap and Prayer)

ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराच्या देव्हाऱ्यात बसून देवी दैवतांचं स्मरण करावं. तसेच, मंत्राचा जप करावा. यामुळे बाळावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होणार नाही. तसेच, हनुमान चालीसाचं पठण करा. धार्मिक मंत्रांचे जप करा. 

2. ध्यान आणि भजन (Meditation And Bhajan)

चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी शांत वातावरणात ध्यान करावं. तसेच, भजन-कीर्तन करावं. यामुळे बाळाचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास होण्यास मदत होईल. 

3. तुळशीची पाने (Tulsi Leaves)

चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिला आपल्या हातात तुळशीची पानं ठेवू शकतात. मान्यतेनुसार, हे सुरक्षा कवच म्हणून कार्य करते. तसेच, बाळाचं हानिकारक ऊर्जेपासून संरक्षण करते. 

4. डोकं आणि पोट झाकून ठेवा 

चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी ओढणी किंवा हलका कपडा घेऊन आपलं डोकं आणि पोट झाकून ठेवावं. यामुळे नकारात्मक प्रभाव पडत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. ग्रहण काळ संपल्यास पवित्र गंगाजलाने स्नान करा. तसेच, नवीन आणि स्वच्छ करडे परिधान करा.                         

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                       

Chandra Grahan 2025 : सावधान! आज संध्याकाळी 'ही' 5 कामं करु नका; आयुष्यभर होईल पश्चात्ताप, पदोपदी राहा सावध