Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, 2025 या वर्षात पहिल्यांदा संपूर्ण चंद्रग्रहणासह (Chandra Grahan 2025) पितृपक्षाची (Pitru Paksha 2025) सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात सुद्धा दिसणार आहे. त्यानुसार, आज म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण चंद्रग्रहणासह पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. ज्याचा सुतक काळ आत्तापासूनच सुरु झाला आहे.
चंद्रग्रहणाच्या वेळी संध्याकाळी 'ही' कामं करु नका
(Do not do these things in the evening during a lunar eclipse 2025)
- या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करु नये. कारण संध्याकाळपासून सुतक काळ सुरु होणार आहे.
- सूर्यास्तानंतर भोजन करु नका.
- रात्रीच्या वेळी चंद्राला पाहू नका. तसेच, शक्य असल्यास घराबाहेर पडू नका.
- तसेच, जर तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर त्याची सुरुवात आजपासून करु नका.
- तसेच, काळे वस्त्र परिधान करु नका.
चंद्रग्रहणाचा सुतक काळ कधी सुरू होईल?
(When will the Sutak period of the lunar eclipse begin?)
वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल, त्यामुळे त्यानुसार ते 9 तास आधी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:57 वाजता सुरू होईल. त्यानंतर सर्व मंदिरांचे दरवाजे बंद होतील. तसेच, या काळात सुतक काळ सुरू होतो, तेव्हा अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने किंवा दुर्वा घाला. जर हे चंद्रग्रहण भारतात दिसले असते, तर भारतातही सुतक काळ वैध असता.
पितृपक्ष म्हणजे काय? (What Is Pitru Paksha)
पितृपक्ष हा आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो. त्यामुळे खरंतर तो चांगला काळ आहे. मात्र, या काळात अनेक गोष्टी निषिद्ध समजल्या जातात. विशेषत: या कालावधीत कुठल्याही नव्या कामाची सुरुवात केली जात नाही. तसेच, कुठलीही मोठी खरेदी केली जात नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :