Chandra Grahan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्रग्रहणाला (Chandra Grahan) ज्योतिष शास्त्रात फार महत्त्व आहे. ही एक प्रकारे खगोलीय घटना मानली जाते ज्याचा पृथ्वीतलासह मानवी जीवनावर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 या वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण होळीच्या (Holi 2025) दिवशी दिसणार आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे. तसेच, या दिवशी सूर्यसुद्धा मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तब्बल 100 वर्षांनंतर हा दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. काही राशींसाठी हा सकारात्मक परिणाम असेल. तर, काही राशींवर (Zodiac Signs) नकारात्मक परिणाम होणार आहे. 


चंद्रग्रहणाची वेळ 


2025 वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची सुरुवात 14 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांपासून होणार आहे. तर दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे. हे ग्रहण सकाळी असल्या कारणाने भारतात सूतक काळ लागू होणार नाही. 


चंद्रग्रहणाचा 12 राशींवर कसा होणार परिणाम? 


मेष रास (Aries Horoscope)


ग्रहणाटच्या कालावधीत मानसिक तणावाचा तसेच, कामाचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्हाला अनेक अडचणींचा समान करावा लागेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


तुमच्या कुटुंबात तुम्हाला अशांतीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, आर्थिक बाबतीत तुमचं नुकसान होऊ शकतं. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याची आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी. या काळात अधिक सतर्क राहा. 


कर्क रास (Cancer Horoscope)


या काळात तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळी घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यचा प्रयत्न करा. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांनी या काळात आपल्या करिअरवर लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, काही जुने वाद पुन्हा उद्भवू शकतात. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या जीवनावर ग्रहणाचा सकारात्मक परिणाम पडू शकतो. या काळात तुम्हाला नोकरीत यश मिळेल. मात्र, कुटुंबियांकडे दुर्लक्ष होईल.


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांनी या काळात आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर आणि मानसिक स्थितीवर लक्ष देणं गरजेचं आहे. नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील. पण, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर लक्ष द्या. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, मुलांच्या अभ्यासा संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात. 


मकर रास (Capricorn Horoscope)


या राशीच्या लोकांना कुटुंबात अनेक समस्या येतील. त्यामुळे तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


चंद्रग्रहणाचा हा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरणार आहे. या काळात प्रगतीचे अनेक नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, नातेवाईकांमध्ये नातं चांगलं टिकून राहील. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांची या काळात मानसिक स्थिती फारशी ठीक नसणार आहे. या काळात पैशांचे देवाण-घेवाण करु नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:  


Surya- Rahu Yuti 2025 : लवकरच होणार सूर्य-राहूची युती; 14 मार्चपासून 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, अचानक लागणार लॉटरी