Chhaava Box Office Collection Day 26: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा'च्या (Chhaava Movie) रुपात बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) वादळ आलं आहे. हिस्टॉरिकल ड्रामा असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या चौथ्या आठवड्यातही जोरदार कमाई करत आहे. चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली असली तरी, 'छावा' कोट्यवधींची कमाई करत आहे. एवढंच नाहीतर या चित्रपटानं बॉलिवूडच्या भल्याभल्या दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. अशातच 'छावा'नं रिलीजच्या 26व्या दिवशी किती कोटींची कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा'नं 26व्या दिवशी किती कोटींची कमाई केली?
'छावा'ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना आकर्षित करतोय. 'छावा' चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनयानं विक्की कौशलनं सर्वांना अचंबित केलंय. तसेच, त्याच्याव्यतिरिक्त इतर स्टारकास्टही प्रेक्षकांसह समिक्षकांकडून जोरदार कौतुक सुरू आहे. यासोबतच 'छावा' चौथ्या आठवड्यात जोरदार कमाई करत आहे. 25व्या दिवशी, या चित्रपटानं गदर 2 च्या लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. अशातच जर चित्रपटाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर...
- 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 180.25 कोटी रुपये कमावले.
- तर तिसऱ्या आठवड्यात 'छवा'ने 84.05 कोटी रुपये कमावले होते.
- तर 22 व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 8.75 कोटी रुपये होते.
- चित्रपटानं 23 व्या दिवशी 16.75 कोटी रुपये कमावले.
- 'छवा'ने 24 व्या दिवशी 10.75 कोटी रुपये कमावले.
- 25 व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 6 कोटी रुपये होते.
- आता 'छवा'च्या 26 व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आले आहेत.
- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 26 व्या दिवशी 5 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'छावा'ची 26 दिवसांत एकूण कमाई आता 529.95 कोटी रुपये झाली आहे.
'छावा'नं 26 व्या दिवशी पुष्पा 2, पठाणसह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
'छावा'नं 26 व्या दिवशीही उत्तम कलेक्शन केलं आहे. यासह, या चित्रपटानं पठाण, स्त्री 2, बाहुबली 2, उरी, कांतारा, गदर 2 यासह अनेक चित्रपटांचा 26 व्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडला आहे आणि सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट बनला आहे.
- 'जवान'नं 26 व्या दिवशी 6.65 कोटी रुपये कमावले.
- 26 व्या दिवशी पुष्पा 2 ची कमाई 5.5 कोटी रुपये होती.
- 'छावा'नं 26 व्या दिवशी 5.15 कोटींची कमाई केली आहे.
- पठाणचं 26 व्या दिवसाचं कलेक्शन 4.15 कोटी रुपये होतं.
- स्त्री 2 नं 26 व्या दिवशी 3.25 कोटींची कमाई केली,
- बाहुबली 2 नं 26 व्या दिवशी 2.8 कोटी रुपये कमावले.
- 26 व्या दिवशी गदर 2 ची कमाई 2.5 कोटी रुपये होती.
- केजीएफ चॅप्टर 2 नं 26 व्या दिवशी 2.35 कोटी रुपये कमावले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :