Surya and Rahu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने संक्रमण करुन इतर ग्रहांबरोबर युती निर्माण करतात. याचा प्रभाव देशभरातली सर्व मानवी जीवनावर होतो. माहितीनुसार, 14 मार्च रोजी मीन राशी राहू (Rahu) आणि सूर्याची (Sun) युती जुळून येणार आहे. तब्बल 18 वर्षांनंतर मीन राशीत ही युती होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. त्याचबरोबर या राशींच्या पद-प्रतिष्ठेतही चांगली वाढ झालेली दिसेल. या लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूची युती फार लाभदायक ठरणार आहे. मकर राशीच्या तिसऱ्या चरणात ही युती होणार आहे. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ दिसून येईल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसून येईल. या काळात तुमच्या पदोन्नतीत चांग


कर्क रास (Cancer Horoscope)


सूर्य आणि राहूच्या युतीने कर्क राशीच्या लोकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. या राशीच्या भाग्य चरणात ही युती जुळून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला या काळात चांगला लाभ मिळेल. तसेच, या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात अधिक वाढ झालेली दिसेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग लवकरच जुळून येणार आहे. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूच्या युतीचा काळ फार अनुकूल ठरणार आहे. कर्म भावात हे संक्रमण होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामकाजात चांगला लाभ मिळेल. तसेच, आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार झालेला पाहायला मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                          


Shani Gochar 2025 : होळीनंतर 'या' 3 राशींचं नशीब पालटणार; अचानक मिळणार मोठी संधी, पैसा चुंबकासारखा हातात खेळणार