Maharashtra Politics मुंबई: राज्य सरकारची लोकप्रिय योजना ठरलेली 'आनंदाचा शिधा' योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पात 'आनंदाचा शिधा' योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. इतकेच काय, तर त्या योजनेबाबत अवाक्षरही काढण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


गेल्या निवडणुकीत महायुतीकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेला कुठेतरी बगल दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना आता बंद झाल्याचं स्पष्ट आहे. आनंदाचा शिदा योजनेबाबत राज्य सरकारकडून अवाक्षरही काढण्यात आलेले नाही. त्यामुळे या योजनेलाच महायुती सरकारने रामराम केल्याचे बोलले जात आहे.


एकनाथ शिंदे यांचे महत्व संपले- विजय वडेट्टीवार


आता योजनांचे महत्व संपले आणि एकनाथ शिंदे यांचे देखील महत्व संपले आहे. लाडका बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची योजना होती. त्यांना वाटलं होत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर ही योजना चांगल्या पद्धतीने चालवता येईल. पण आता ते मुख्यमंत्री नाहीत आणि ज्या योजना त्यांनी सुरू केल्या त्या बंद पाडल्या जातायत. आनंदाचा शिधा तुम्ही चालू केली होती, तो शिधा कुठे आहे?, गोरगरिबांच्या योजना हे सरकार बंद करत आहे, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.


संजय राऊत काय म्हणाले?


सरकारने आनंदाचा शिधा, तीर्थयात्रा योजना, शिवभोजन थाळी या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या होत्या. आता 4 वर्ष निवडणुका नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. तर महाराष्ट्राच्या जनतेला गाजर दाखवण्यचं काम या सरकारने केलं आहे. शिवभोजन थाळी या योजनेला या अर्थसंकल्पात निधी नाही म्हणजे ही योजना बंद होईल. आनंदाचा शिधाचा निवडणूक काळात उपयोग केला आता हा आनंदाचा शिधा दु:खाचा झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला. 


संबंधित बातमी:


'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO


Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला


एबीपी माझा हेडलाईन्स : 7.30 AM : 12 March 2025, VIDEO: