Chandra Grahan 2025 Lucky Zodiac Signs : वैदिक शास्त्रानुसार, आज वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) लागणार आहे. भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण रात्री 9 वाजून 58 मिनिटांपासून सुरु होणार आहे. तर, 01 वाजून 26 मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे जवळपास 3 तास 28 मिनिटांचा ग्रहणाचा कालावधी असेल. तसेच, हे चंद्रग्रहण भारतात सुद्धा लागणार असल्या कारणाने याला फार महत्त्व आहे. या चंद्रग्रहणाने काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. कारण चंद्रग्रहणानंतर या राशींचं भाग्य उजळू शकतं. त्यामुळे या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना चंद्रग्रहणापासून चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. अशा वेळी धनसंपत्तीची देखील आवक वाढू शकते. नकारात्मक गोष्टींचे विचार मनात येणार नाहीत. आरोग्याच्या बाबतीत दिर्घकालीन आजारातून तुमची सुटका होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
चंद्रग्रहणानंतर वृषभ राशीचे चांगले दिवस सुरु होतील. या काळात तुमच्या सामाजिक पद-प्रतिष्ठेत वाढ झालेली दिसेल. तसेच देवी लक्ष्मीचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाची साधनं वाढवण्याचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. तसेच, तुमच्या बजेटवर लक्ष द्या. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
धनु रास (Saggiatrius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणानंतरचा काळ फार भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्ही निश्चिंत असाल. करिअरमध्ये तुमच्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. याचा तुम्ही वेळीच लाभ घेणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :