Chandra Grahan 2022 Effect on Zodiac : यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) आज 16 मे रोजी होणार आहे. वृश्चिक राशीतील हे चंद्रग्रहण (Chandra Grahan) भारतात दिसणार नाही. या  दिवशी विशाखा नक्षत्र आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणात एक विशेष योग तयार होत आहे. ज्याचा जीवनावर अनुकूल परिणाम होईल. ग्रहण जरी अशुभ मानले जात असले जाते. पण हे चंद्रग्रहण एका विशेष योगात असल्यामुळे काही राशींवरही त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. 


चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) ही एक खगोलीय घटना आहे. परंतु ज्योतिषशास्त्राच्या कालगणनेनुसार विविध ग्रह आणि नक्षत्रांसह चंद्रग्रहणाचा विशेष योग तयार होत असल्याने यावेचा जनजीवनावर परिणाम होतो. यंदाचं चंद्रग्रहण अधिक परिणामकारक आणि फलदायी ठरणार आहे. आज सोमवारी होणाऱ्या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल.


'या' राशींवर चंद्रग्रहणाचा (Chandra Grahan 2022) विशेष प्रभाव


मेष
मेष राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा (Chandra Grahan 2022) विशेष प्रभाव पडेल. व्यवसाय आणि व्याप्ती वाढेल. प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. नोकरीत तुम्हाला अनुकूल लाभ मिळेल. इतरांसोबत चांगले संबंध राहतील. धन, कीर्ती आणि वैभव वाढेल.


सिंह
सिंह राशीच्या लोकांवरही चंद्रग्रहणाचा (Chandra Grahan 2022) अनुकूल प्रभाव राहील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून लाभ मिळू शकतो. वडिलधाऱ्या किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. बोलताना संयम बाळगा. कार्यक्षेत्रात जिद्द आणि मेहनतीनं काम करा.


धनु
धनु राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा सकारात्मक परिणाम होईल. आर्थिक प्रगती होईल. व्यवसायात नफा होईल. नवीन गुंतवणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांनी संयमानं काम करावं. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :