Lunar Eclipse 2022 :  2022 वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे 16 मे रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण IST सकाळी 7.02 वाजता होणार आहे आणि ते दुपारी 12.20 पर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. 


लाइव्ह स्ट्रीम कसे पहावे?
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही परंतु आपण नासाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याचे लाईव्ह स्ट्रिम पाहू शकता. NASA त्याच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसेच त्यांच्या YouTube चॅनेलवर देखील कार्यक्रमाचे प्रसारण करणार आहे.



चंद्रग्रहण कशामुळे होते?


संपूर्ण चंद्रग्रहणात पृथ्वी पूर्णपणे चंद्र आणि सुर्याच्या मध्ये येते, यामध्ये पृथ्वी चंद्राला पूर्णपणे व्यापते. या ग्रहणात चंद्राचा रंगही लाल होतो आणि त्यावर डागही दिसतात, ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण चंद्रग्रहण हे सर्वात प्रभावी मानले जाते. 6 मे रोजी होणारे हे चंद्रग्रहण या वर्षातील पहिले चंद्रग्रहण असेल आणि दुसरे 8 नोव्हेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे.


ब्लड मून म्हणजे काय?


चंद्रग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र पूर्ण ग्रहण असतो. म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण असेल तर ते चंद्रग्रहण ब्लड मूनसारखे दिसते. ब्लड मूनची घटना खूप सुंदर आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण झाल्यास पृथ्वीची सावली चंद्राच्या प्रकाशाला झाकून टाकते. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणावर आदळतो आणि चंद्रावर पडतो तेव्हा तो अधिक उजळ होतो. अशा स्थितीत जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे ते आणखी उजळ दिसते म्हणजे गडद लाल दिसते. खगोलशास्त्रात या घटनेला ब्लड मून म्हणतात.


कुठे दिसणार चंद्रग्रहण?


2022 सालचे पहिले चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागांव्यतिरिक्त युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.