Chandra Grahan 2022 : हिंदू पंचागानुसार देव दीपावली (Diwali 2022) कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. अशी मान्यता आहे, यानिमित्ताने देवी-देवता दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवर येतात. यंदा कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबरला आहे. या दिवशी चंद्रग्रहणही (Chandra Grahan 2022) आहे. हे वर्षातील शेवटचे ग्रहण आहे.


राहू आणि केतूची वाईट दृष्टी


भारतासह जगातील अनेक देशांमध्ये चंद्रग्रहण एकाच वेळी दिसणार आहे. तर, भारतात चंद्रग्रहण संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल आणि 6.19 वाजता संपेल. जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होते अशी धार्मिक मान्यता आहे. या काळात पृथ्वीवर राहू आणि केतूची वाईट दृष्टी राहते. 


धार्मिक आख्यायिका काय?


सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान श्री हरी विष्णूजींनी अमृत मिळविण्यासाठी राहू-केतू यांचा वध केला होता. त्यावेळी राहू आणि केतू चंद्र आणि पृथ्वीच्या सावलीत स्थान देण्यात आले होते


भारतात चंद्रग्रहण प्रभावी


भारतात चंद्रग्रहण प्रभावी ठरेल. या दिवशी सुतकही वैध असेल. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. त्यामुळे केलेले कामही बिघडते. त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खालील उपाय करा. 


ग्रहणकाळात 'या' मंत्राचा जप करावा


राहु-केतूच्या वाईट दृष्टीमुळे व्यक्तीच्या जीवनात अस्थिरता येते असे शास्त्रात सांगितले आहे. यासाठी ग्रहणकाळात राहू आणि केतूचा प्रभाव टाळण्यासाठी मंत्राचा जप करावा. धार्मिक पंडितांच्या मते ग्रहण काळात तुळशीच्या पानांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.


ॐ ह्लीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय


जिह्ववां कीलय बुद्धि विनाशय ह्लीं ओम् स्वाहा।।


या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीवर पडणाऱ्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो. यासोबतच व्यक्तीला शत्रूपासून मुक्ती मिळते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी चंद्रग्रहणाच्या वेळी या मंत्राचा जप करावा.


महामृत्युंजय मंत्राचा जप


चंद्रग्रहणाच्या वेळी लोकांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. राहू आणि केतूच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी या काळात महामृत्युंजय मंत्राचा जप खूप फायदेशीर ठरतो असे मानले जाते.


महामृत्युंजय मंत्र: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥


संबंधित बातम्या


Chandra Grahan 2022 : 'या' वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कधी? वेळ, सुतक काळ आणि भारतातील प्रभाव जाणून घ्या