Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले. ते एक कुशल रणनीतीकार आणि उत्तम अर्थशास्त्रज्ञही होते. आचार्य चाणक्य यांनी स्त्रियांचे यश, त्यांचे नाते आणि आचरण यावर तपशीलवार विचार मांडले आहेत. चाणक्य म्हणतात की, कुटुंबातील महिला घराचा कणा असतात. चाणक्यांनुसार, घरातील महिलांच्या काही खास सवयी असतात, ज्या कुटुंबाच्या आनंदात महत्वाची भूमिका बजावतात. जर महिलांमध्ये या सवयी असतील तर त्यांचे कुटुंब नेहमी आनंदी आणि नेहमीच प्रगती करत असते. (Chanakya Niti)


पैशाचे व्यवस्थापन


आचार्य चाणक्य म्हणतात की, पुरुषांपेक्षा स्त्रियांना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे चांगले माहित असते. सुखी जीवनासाठी, घरातील महिलांनी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबात पैसे साठवण्याची सवय निर्माण होते. महिलांच्या या सवयीमुळे संकटकाळातही कुटुंब सुरक्षित राहते, कुटुंबाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ज्या स्त्रिया समजूतदारपणे आणि भविष्याचा विचार करून काम करतात, त्या नेहमी काही ना काही पैसे वाचवतात, ज्याचा सुगावा घरच्यांनाही लागत नाही. आणि कठीण समयी त्याच पैशांचा उपयोग घरासाठी करतात


समाधानी 


आपल्याकडे जे आहे ते पुरेसे आहे, अशी भावना ज्या महिलांना असते, त्यांचे कुटुंब नेहमीच आनंदी असते. समाधानी स्त्रिया कौटुंबिक मान-सन्मान कधीच ओलांडत नाहीत, अशा स्त्रिया कुटुंबाच्या स्थितीनुसार त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. कठीण प्रसंगातही अशा स्त्रिया कुटुंबासोबत आपुलकीने जगतात. ज्या महिलांना ही सवय असते, त्यांचा परिणाम त्यांच्या भावी पिढीवरही दिसून येतो. चाणक्य म्हणतात की, आपल्या इच्छांना मारणे योग्य नाही, परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन काम केले तर कधीच कोणाच्या समोर हात पसरण्याची गरज भासणार नाही आणि सन्मानाच्या बाबतीत कधीही तडजोड करावी लागणार नाही. अशा स्त्रियांमुळे कुटुंब नेहमी समृद्ध होते.


संयम आणि इच्छाशक्ती


आचार्य चाणक्य म्हणतात की, स्त्रिया जास्त भावनिक असतात, परंतु इच्छाशक्ती प्रबळ असलेल्या महिला त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि भविष्यात पुढे जाण्याचा विचार करतात. चाणक्य म्हणतात की, ज्या स्त्रियांमध्ये संयमाची भावना असते त्यांच्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ देत नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते, घरामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या स्त्रिया घरातील कठीण प्रसंगातही हसतमुख राहतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Chanakya Niti: ही 4 कामं करणारे कुटुंब सदैव सुखी असते, दु:खाची छायाही त्यांच्या जवळ येत नाही, चाणक्य म्हणतात...