अमरावती: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. रशिया युद्धावेळी ज्याप्रकारे आमची मुलं झेंडे घेऊन बाहेर पडली तेव्हा मोदींची ताकद कळाली. आज पाकिस्तान जो शांत बसला आहे, त्यामागेही मोदीजी आहेत. पंतप्रधान मोदीजी (PM Modi) विश्वभरात काम करत आहेत, ते शेवटच्या नव्हे तर पहिल्या रांगेत आहेत, असे वक्तव्य अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Loksabha) भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आज अमरावतीमध्ये सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


यावेळी नवनीत राणा यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडविली. काहीजण राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगत आहेत. पण केवळ दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांना राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे वाटत आहे. पण उघड्या डोळ्यांना पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नसतात, ही गोष्ट काँग्रेसने लक्षात घेतली पाहिजे. पंतप्रधान मोदींची आज जगभरातील कामगिरी पाहता त्यांच्या नेतृत्त्वाशी राहुल गांधी यांची तुलना होऊच शकत नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले. 


देशात मोदींची हवा होती, आहे आणि राहील: नवनीत राण


नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी अमरावीतमध्ये प्रचार करताना देशात यंदा मोदी लाट नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी आज म्हटले की, देशात मोदींची हवा आहे. त्यामुळे आमच्यासमोर कोणतंही आव्हान नाही. देशात मोदींची हवा होती, आहे आणि कायम राहील, असे राणा यांनी म्हटले.


तसेच मला माझ्या गेल्या पाच वर्षांमधील कामगिरीचा अभिमान वाटत असल्याचेही नवनीत राणा यांनी सांगितले. अमरावतीमधील गोरगरीब माझ्या पाठिशी आहेत. माझ्या चांगल्या कामगिरीमुळेच मविआच्या राज्यभरातील नेत्यांना अमरावतीमध्ये यावं लागत आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले.  


अमित शाहांची अमरावतीमध्ये सभा

नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह आज अमरावतीमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.  या सभेत अमित शाह हे बच्चू कडू, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविषयी काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


शरद पवारांच्या मनात भाजप, त्यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या; रवी राणांचा खळबळजनक दावा