Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिशास्त्रामध्ये (Chanakya Niti) व्यवसाय, वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा केली आहे. जीवनात यश मिळवण्यासाठीची गुरुकिल्ली या नीतिशास्त्रात सांगितली आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी केवळ काही मोजक्याच लोकांची गरज असते. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यात मोजक्याच लोकांचा सहभाग असावा, तरच यश मिळवता येते, असे चाणक्य सांगतात. यातील काही कामं तर एकट्यानेच करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांच्या मते, आयुष्यात अशी पाच कामे आहेत, जी निर्धारित मनुष्यबळासहच पूर्ण करावी, तरच यश मिळते. चला तर, जाणून घेऊया आचार्य चाणक्य याबद्दल काय सांगतात...
तपश्चर्या
आचार्य चाणक्य म्हणतात की, तपश्चर्या नेहमी एकट्याने करावी, तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. अनेक लोकांसह मिळून तपश्चर्या केल्याने मन व लक्ष विचलित होते आणि ध्येय साध्य होत नाही. तुम्ही एकट्याने तपश्चर्या करूनच आपले ध्येय गाठू शकता.
अभ्यास
अभ्यास करण्यासाठी कार्यात दोन व्यक्तींचा सहभाग असणे योग्य आहे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणी बसून अभ्यास करत असतील, तर ज्ञानाची देवाणघेवाण होते. तसेच, एखाद्या विषयात एखादी अडचण आली की, एकमेकांची मदतही करता येते.
मनोरंजन
आचार्य चाणक्यांच्या मते मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी किमान तीन लोक असणे आवश्यक आहे. यामध्ये लोकांची संख्या अधिकही असू शकते. परंतु, तीनपेक्षा कमी लोकांमध्ये मनोरंजन होत नाही.
शेती
शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. शेती हे कोणा एका किंवा दोन लोकांचे काम नाही. कारण, शेतीशी संबंधित अनेक कामे असतात, ज्यात अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. चाणक्य नीतिनुसार शेतीचे काम किमान पाच जणांनी मिळून केले पाहिजे. तरच, याचे चांगले परिणाम प्राप्त होतात.
युद्ध
युद्धात जेव्हा तुमच्या बाजूने अनेक लोक उभे असतात, तेव्हाच विजयाची शक्यता वाढते. राजा-महाराजही युद्धावर जाण्यापूर्वी सैन्याच्या संख्येचा विचार करत असत. परंतु, अतिउत्साहात कधीही भान हरवू नये, असे म्हणतात. यामुळेच मोठी लढाई जिंकायची असेल, तर अनेक मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
हेही वाचा :