Chanakya Niti : असं म्हणतात दोन जीवांची रेशीमगाठ ब्रम्हदेव स्वर्गात बनवतात, पण वैवाहिक जीवन सुखी ठेवण्याची जबाबदारी मानवाची आहे. पती-पत्नीच्या नात्यात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी चाणक्याने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
सुखी वैवाहिक जीवनाचे सूत्र
सुखी वैवाहिक जीवनाचे हे सूत्र आहे की, पती-पत्नी एकमेकांचा आधार आहेत. चाणक्य सांगतात की ज्याप्रमाणे पत्नीचे रक्षण करणे हे पतीचे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे पती कुठल्या संकटात असेल, तर त्याची काळजी करणे ही पत्नीची जबाबदारी आहे.
पती-पत्नीचा एकमेकांवर अधिकार
वैवाहिक जीवनात पती-पत्नीचा एकमेकांवर अधिकार असतो. चाणक्याच्या मते, पती नाराज किंवा दुःखी असल्यास प्रेमातून काळजी घेणे किंवा त्याला आनंदी ठेवणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. यामुळे वैवाहिक संबंध कधीही बिघडणार नाहीत आणि ते दोघेही नेहमीच एकमेकांसोबत राहतील.
वैवाहिक जीवनात या गोष्टीची कधीही लाज बाळगू नये.
चाणक्यनीतीनुसार, पती-पत्नीने एकमेकांवरील प्रेम, त्याग आणि समर्पणाची कधीही लाज बाळगू नये. असे केल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि नाते हळूहळू बिघडत जाते.
विश्वास महत्वाचा
वैवाहिक जीवनाची गाडी तेव्हाच पुढे सरकते जेव्हा तिच्यावर विश्वास असतो. एक प्रामाणिक व्यक्ती आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणाकडूनही प्रेमाची अपेक्षा करत नाही. अशा स्थितीत पत्नीने देखील पतीला कधी दगा देऊ नये.
पत्नी या गोष्टी पतीपासून लपवते
चाणक्यनीतीमध्ये म्हटले आहे की, पत्नी तिच्या काही गोष्टी पतीपासून लपवते. जसे की गंभीर आजार, कौटुंबिक मतभेद इत्यादी, यामागे महिलांचा उद्देश असतो की तिला आपल्या पतीला त्रास द्यायचा नाही.
बाह्य सौंदर्य पाहून जोडीदार निवडू नये.
चाणक्यांनी आपल्या धोरणात सांगितले आहे की, एखाद्या महिलेचे बाह्य सौंदर्य पाहून जीवनसाथी निवडू नये. नेहमी एखाद्या व्यक्तीचा त्याच्या गुणांवरून निवड करा, कारण एक सुसंस्कृत स्त्री केवळ तिच्या पतीच्या जीवनात आनंद आणत नाही तर तिच्यामुळे कुटुंबातील अनेक पिढ्या नकारात्मक गोष्टींपासून वाचतात.
पती-पत्नीचे नाते हे एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे
आचार्य चाणक्यांच्या मते पती-पत्नीचे नाते हे एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. त्यांचे आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण राहते, परंतु अनेकदा गैरसमज किंवा छोट्या-छोट्या कारणांमुळे पती-पत्नीच्या प्रेमाच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. आचार्य चाणक्य म्हणतात प्रेम किंवा वैवाहिक जीवनात दोघांनीही एकमेकांच्या सुखाची काळजी घेतली पाहिजे. आयुष्यात अनेक वेळा पती-पत्नीला एकमेकांच्या आनंदासाठी आपल्या इच्छेचा त्याग करावा लागतो. अशा छोट्या त्यागांमध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनाचे यश दडलेले असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Chanakya Niti: चाणक्यांच्या 3 गोष्टींवर विश्वास ठेवणारे प्रेमात नेहमीच होतात यशस्वी! नात्यात दुरावा येत नाही, चाणक्यनीतीत म्हटलंय...