Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते पती-पत्नीचे नाते (Relationship) हे एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. त्यांचे आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण राहते, परंतु अनेकदा गैरसमज किंवा छोट्या-छोट्या कारणांमुळे पती-पत्नीच्या प्रेमाच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. आचार्य चाणक्य म्हणतात प्रेम किंवा वैवाहिक जीवनात दोघांनीही एकमेकांच्या सुखाची काळजी घेतली पाहिजे. आयुष्यात अनेक वेळा पती-पत्नीला एकमेकांच्या आनंदासाठी आपल्या इच्छेचा त्याग करावा लागतो. अशा छोट्या त्यागांमध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनाचे यश दडलेले असते.


 


प्रेम आणि वैवाहिक जीवनाचे यश कशात असते?


आचार्य चाणक्यांच्या मते कुठल्याही नातेसंबंधात अर्धे सत्य आणि अर्धे खोटे विषाप्रमाणे असतात. चाणक्यांच्या मते, जर तुम्हाला प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन सुखी तसेच आनंदी बनवायचे असेल तर या नात्याला मजबूत बनवण्यासाठी दोघांनी मिळून विचार करणे आणि येणाऱ्या अडचणींचा एकत्रितपणे विचार करणे महत्त्वाचे आहे, तरच त्यावर उपाय सापडेल. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदाराला समान दर्जा द्या. त्यांचं म्हणणंही ऐका आणि मग एकत्र समस्या सोडवा. असे म्हटले गेले आहे.



प्रेम आणि समर्पण


प्रेम आणि समर्पण हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. चाणक्य म्हणतात की केवळ जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या सुखासाठी केलेल्या त्यागामुळे प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन यशस्वी होते. जे लोक नात्यात 'आम्ही' ही भावना ठेवतात, ते नातं चांगल्या प्रकारे सांभाळतात. या संबंधांमध्ये, दुःखाची व्याप्ती शून्याच्या बरोबरीची असते. प्रेमसंबंध असो किंवा वैवाहिक जीवन, जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल तर त्याच्याशी प्रामाणिक राहा, कारण याच आधारावर नाते घट्ट होते आणि जोडीदार बंद डोळ्यांनीही तुमच्यावर विश्वास ठेवतो.



तुमचे निर्णय जोडीदारावर लादू नका


विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. नात्यात विश्वास नसेल तर ते जास्त काळ टिकू शकत नाही. जे लोक आपल्या लाइफ पार्टनरला त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य देतात, त्यांचे नाते नेहमीच यशस्वी होते. लक्षात ठेवा की जो व्यक्ती आपला निर्णय जोडीदारावर लादत नाही, तो प्रेम संबंधात नेहमीच आनंदी असतो. चाणक्य सांगतात की, घर आणि कामाची जबाबदारी समसमान वाटून घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नगण्य ठरते. एकमेकांना मदत करणारे जोडपे नेहमी आनंदी असतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Chanakya Niti : प्रेमच आहे प्रत्येक नात्याचा आधार! चाणक्यांची 'ही' गोष्ट ज्याला समजली, त्याने जग जिंकलेच समजा!