Chanakya Niti : चाणक्याची शिकवण आणि धोरणे माणसाला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करतात. असे अनेक लोक आहेत ज्यांना मेहनत करूनही यश मिळत नाही. चाणक्याच्या मते, कलियुगातील बदलत्या काळानुसार जर तुम्ही स्वतःमध्ये काही बदल केले नाहीत, तर तुम्ही यश मिळविण्याच्या स्पर्धेत मागे राहाल. चाणक्य म्हणतो की, जर तुम्हाला पुढे जायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही केवळ मेहनत करून नाही तर तुमच्या बुद्धीने काम केले पाहिजे. चाणक्याने सांगितलेला यशाचा निश्चित मंत्र जाणून घेऊया.


चाणक्य नुसार जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो त्याला नक्कीच यश मिळते. तुम्ही केलेल्या कामात किती प्रामाणिकता आहे यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे कामात अप्रामाणिकपणा कधीही करू नका, मग ते मोठे असो किंवा लहान. नशिबावर नाही तर कामावर विश्वास ठेवा.


कामाची तुलना करू नका


यानंतर चाणक्य म्हणतात की, माणसाने आपल्या कामाची तुलना इतर लोकांच्या कामाशी कधीही करू नये. कारण वेळ नेहमी सारखी नसते. सूर्य आणि चंद्र दोघेही चमकतात पण आपापल्या वेळी.


क्षमता आणि सामर्थ्य


माणसाने नेहमी त्याच्या सामर्थ्यानुसार आणि क्षमतेनुसार काम केले पाहिजे. या दोघांकडे दुर्लक्ष करून काम केले तर केलेली मेहनत व्यर्थ जाईल. कारण क्षमतेशिवाय आणि ताकदीपेक्षा जास्त काम केल्यास अपयशाची शक्यता वाढते.


ध्येय साध्य करण्यासाठी या गोष्टी आवश्यक


ध्येय साध्य करण्यासाठी ठिकाण, परिस्थिती आणि एकत्र काम करणारे लोक यांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या सोबत खऱ्या मनाने कोण आहे, कोण फक्त दिखाव्यासाठी आहे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे कामाच्या दिशेने व्यक्तीचे मनोबल वाढण्यास मदत होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :