Horoscope Today,June 21, 2022 : आज चंद्र मीन राशीत आहे आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र आहे. सूर्य मिथुन राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनी आता कुंभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांनी आज पैशांचे व्यवहार पुढे ढकला. वृषभ राशीच्या लोकांनी वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणतीही जोखीम घेऊ नका. जाणून घ्या आजचे मेष ते मीन राशींचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज तुमचा वेळ धार्मिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये जाईल. एखाद्या गोष्टीच्या गोंधळामुळे योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. आज पैशांचे व्यवहार पुढे ढकला. एखाद्या गोष्टीची भीती मनात राहील. नोकरदारांना काम वेळेवर न झाल्यामुळे चिंता सतावेल. धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल. परदेशात राहणार्या नातेवाईकांची बातमी मिळेल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.
वृषभ (Taurus Horoscope) : तुमची कोणतीही आर्थिक योजना सफल होऊ शकते. बरीचशी कामे योग्य पद्धतीने होतील. सामाजिक कार्यात तुमचे निस्वार्थ योगदान तुम्हाला मनःशांती देऊ शकते. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणतीही जोखीम घेऊ नका. व्यवसाय वाढेल, तसेच व्यवसायाशी संबंधित सौदे फायदेशीर सिद्ध होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. पगारदार लोकांना काही नवीन काम मिळू शकते.
मिथुन (Gemini Horoscope) : शारीरिक व मानसिक आनंद राहील. नोकरी आणि व्यवसायात तुमची मेहनत फळाला येईल. अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनाने तुमचा उत्साह वाढेल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना तयार करू शकता. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. सरकारी कामे पूर्ण होतील. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल नाही.
कर्क (Cancer Horoscope) : मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. काही कामात अडथळे येऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या. मनःशांती लाभेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिकूलतेचा सामना करावा लागू शकतो. वादविवादांपासून दूर राहा. नोकरीत लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस चांगला आहे.
सिंह (Leo Horoscope) : आरोग्याबाबत जागरुक राहा. अधिक धावपळ होईल. वडिलांची साथ मिळेल. मन अस्वस्थ होईल. अनावश्यक खर्च जास्त होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीतून पैसे मिळू शकतात. कामात भावांची मदत मिळेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे पिणे टाळावे.
कन्या (Virgo Horoscope) : अनावश्यक वाद टाळा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आपल्या वैयक्तिक बाबींमध्ये इतरांना ढवळाढवळ करू देऊ नका. तुमचे यश इतरांना दाखवू नका. यामुळे तुमच्या विरोधकांना हेवा वाटू शकतो. आर्थिक लाभामुळे मनातील चिंता दूर होतील. घरातील कामे प्रलंबित कामांची यादी लांबली असेल, तर प्राधान्य यादी तयार करून ती कामे निकाली काढण्याचे नियोजन करा.
तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस सकारात्मक असेल. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला आणि मार्गदर्शनाचे पालन केल्यास निश्चित यश मिळू शकते. जवळच्या नातेवाईक किंवा मित्रांशी मतभेद होऊ शकतात. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. एखाद्याच्या सल्ल्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याची योग्य चर्चा करा.मनात निराशा आणि असंतोष असू शकतो. कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. वाणीत गोडवा राहील. जास्त राग टाळा.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कार्यक्षेत्र वाढेल. उत्पन्न वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. एखाद्या विशिष्ट कामासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. खास व्यक्तीशी संवादही होऊ शकतो. नकळत कोणाशी वाद होऊ शकतो. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. मालमत्तेबाबत आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रात केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य फळ मिळू शकेल.
धनु (Sagittarius Horoscope) : कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. वाहन सुखाचा लाभ मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास कमी होईल. बोलण्यात सौम्यता राहील. कौटुंबिक समस्या त्रास देतील. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. तब्येत बिघडू शकते. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी संयमाने काम करत राहा. वाद टाळण्यासाठी बहुतेक वेळा मौन बाळगा.
मकर (Capricorn Horoscope) : विरोधकांवर विजय मिळवू शकाल. नवीन काम सुरू होईल. त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात नफा मिळू शकेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. आधीच पैसे कुठेतरी गुंतवले असतील, तर तुम्हाला फायदा होईल. शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. परिस्थिती आणखी बिघडू शकते. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. मित्राच्या मदतीने व्यवसायात सुधारणा होईल. धावपळ वाढेल, पण लाभाच्या संधीही मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ (Aquarius Horoscope) : मानसिक समस्या आणि काही गोंधळ निर्माण होईल. निर्णय घेणे कठीण होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर काही वेळ वाट पाहा. बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल, तर कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल. थकवा जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ संमिश्र आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. घाईघाईने आणि भावनिक निर्णय घेऊ नका. यामुळे काही चुका होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces Horoscope) : मनाचा आनंद आज तुमच्यामध्ये चैतन्य आणि ऊर्जा निर्माण करेल. नवीन कामे हातात घेतल्यास त्यात यश मिळेल. नोकरदारांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मात्र, दुपारनंतर परिस्थिती बदलेल. मनाने कोणताही निर्णय घेताना संभ्रमाची स्थिती राहील. यावेळी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मान-सन्मान मिळेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :