Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, वाघाकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; यशस्वी जीवनाचा मूलमंत्र चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्या मते, काही प्राण्यांच्या गुणांपासून शिकून व्यक्ती जीवनात यश मिळवू शकतो.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांची गणना जगातील सर्वात श्रेष्ठ विद्वानांमध्ये केली जाते. त्यांच्याद्वारे लिहीला गेलेला ग्रंथी अर्थात चाणक्य नीती (Chanakya Niti) वर्तमानकाळात आजही युवा वर्ग फॉलो करतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात सांगितलं आहे की, पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काहीना काही शिकण्यासारखं आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, काही प्राण्यांच्या गुणांपासून शिकून व्यक्ती जीवनात यश मिळवू शकतो. आतापर्यंत आपण पशु, कुत्रा, गाढव, कावळा आणि सिंह यांच्याकडून आपण नेमके कोणते गुण घ्यावेत हे जाणून घेतलं. आता भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघाकडून कोणते गुण घ्यावेत याविषयी जाणून घेणार आहोत.
वाघाकडून शिका 'या' गोष्टी
प्रभूतं कार्यमपि वा तत्परः प्रकर्तुमिच्छति।
सर्वारम्भेण तत्कार्यं सिंहादेकं प्रचक्षते।।
या श्र्लोकाच्या माध्यमातून चाणक्य यांनी सांगितलं आहे की, काम छोटं असो किंवा मोठं जर तुम्ही ते मन लावून आणि पूर्ण शक्तीनिशी केलं तर त्या कामात तुम्हाला नक्की यश मिळेल. हा गुण आपण वाघाकडून नक्कीच घेण्यासारखा आहे. यामुळेच व्यक्तीने कोणत्याच कामात भेदभाव करू नये. तसेच, कोणतंही कार्य करताना मन लावून करावे. असे केल्याने आयुष्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
इन्द्रियाणि च संयम्य बकवत्पण्डितो नरः।
देशकालः बलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत्।।
चाणक्य नीतीच्या पुढच्या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की, व्यक्तीने वाघाप्रमाणे इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, स्थळ, काळ आणि शक्ती जाणून घेऊन काम केले पाहिजे. असं केल्याने आयुष्यात नक्की तुम्हाला यश मिळते. ज्या व्यक्ती या गोष्टींकडे लक्ष ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात असेल, तर त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश भेटल्याशिवाय राहत नाही. तसेच, या स्वभावाचे व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना अगदी धैर्याने सामोरे जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :