Chanakya Niti : यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आहे. चाणक्य यांच्या धोरणांचे योग्य पालन केले तर माणसाच्या हातून निसटलेल्या गोष्टीही त्याला पुन्हा मिळवता येऊ शकतात असं म्हणतात.  


आपली नीती समजावून सांगताना आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात हंसाचं उदाहरण दिलं आहे. आणि यश मिळविण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती राजहंसाचा हा एक गुण अंगीकारेल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी ती व्यक्ती एका क्षणात सोडवू शकतील. यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी कोणते गुण सांगितले आहे ते जाणून घेऊयात. 


अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्या अल्पं च कालो बहुविघ्नता च ।


आसारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ।।


हंसाकडून जाणून घ्या 'हे' गुण


आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की, या जगात अनेक प्रकारची शास्त्र आणि ज्ञान आहेत. मानवी जीवन खूपच लहान आहे. या जीवनात प्रत्येक व्यक्तीला अनेक अडथळे आणि समस्यांचा सामना करावा लागतो.  


अशा परिस्थितीत माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला हंसाचे विशेष गुण अंगीकारावे लागतील. जसे हंस पाण्यात मिसळलेल्या दुधाचे फक्त दूध घेतो आणि पाणी सोडतो. त्याचप्रमाणे माणसाने आवश्यक ज्ञानाचा विचार करून ते स्वीकारावे आणि इतर गोष्टी बाजूला ठेवाव्यात.


यशासाठी करा 'या' गोष्टी 


आचार्य चाणक्य म्हणतात की, संपूर्ण विश्व हे ज्ञानाने भरलेले आहे ज्यामध्ये काही उपयुक्त आणि काही निरुपयोगी गोष्टींचे मिश्रण आहे. जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडताना हे सर्व ज्ञान व्यक्ती मिळवू शकत नाही. चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तीला एखाद्या विषयाचे थोडे पण पूर्ण ज्ञान असते, तो प्रत्येक संकटाला हसतमुखाने सामोरे जातो आणि त्यावर मातही करतो. मनुष्याने यशस्वी होण्यासाठी केवळ दुधाच्या पाण्यातून संसाररूपात ज्ञान घ्यावे. तरंच तुम्ही यशस्वी व्हाल. अन्यथा आयुष्यात संकटं येत राहतील त्यावर फक्त मात करता आली पाहिजे असं चाणक्य सांगतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, कोंबड्याकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; चाणक्य सांगतात...