Chanakya Niti : माणसाला कठोर परिश्रमाशिवायसुद्धा यश मिळू शकतं; चाणक्यांनी सांगितलं यशस्वी जीवनाचं रहस्य
Chanakya Niti : मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला होता.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची हातोटी होती. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला. आजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले.
चाणक्य यांनी सांगितलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाला वैभव प्राप्त करून देण्याची इच्छा असेल तर तो ती पूर्ण करू शकतो. खरंतर, आपल्या कुटुंबाचं नाव प्रसिद्ध व्हावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी आचार्य चाणक्यांच्या निती शास्त्रात सांगितलेल्या काही चांगल्या सवयींचा अवलंब करावा लागेल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
वैयक्तिक सराव
आचार्य चाणक्य असे मानतात की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाला किंवा स्वतःला गौरव मिळवून द्यायचे असेल तर त्याने आतापर्यंत घेतलेल्या ज्ञानाची किंवा त्याने आतापर्यंत जे काही शिकले आहे त्याची जाणीव केली पाहिजे. सरावानेच त्याचे कौतुक करता येते. म्हणजे माणसाने जीवनात नेहमी सराव करत राहावा. जर एखाद्याने जीवनात सरावाची सवय लावली तर त्याला जीवनात यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
व्यक्तीचे चांगले चारित्र्य
आचार्य चाणक्य मानतात की, एखाद्या व्यक्तीचे चांगले चारित्र्य देखील त्याच्या कुटुंबाला वैभव प्राप्त करण्यास मदत करते. जसे की, एखादी व्यक्ती श्रीमंत किंवा उच्च जातीत जन्माला येते पण या ठिकाणी पैसा महत्वाचा नसून व्यक्तीचे गुण त्याची ओळख बनवतात त्यामुळे तुमचं जर व्यक्तिमत्त्व, चारित्र्य चांगलं असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता.
एखाद्या व्यक्तीने केलेली कृत्ये
आचार्य चाणक्य पुढे म्हणतात की, एखाद्याच्या चांगल्या चारित्र्याचे आचरण करण्याबरोबरच, एखाद्याच्या चांगल्या कर्मांमुळे कुटुंबाचं नावही उंचावते. म्हणून त्याने आयुष्यभर सत्कर्म करत राहावे. व्यक्तीची चांगली कृत्ये त्याचा सन्मान आणि आदर वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सत्कर्म कधीही सोडू नका. एखाद्या व्यक्तीचे चांगले कर्म देखील त्याला जीवनात यश मिळविण्यास मदत करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :