Chaitra Navratri 2024 : हिंदू धर्मानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) सुरुवात झाली. यावेळी 9 ते 17 एप्रिल अशा नऊ दिवसांच्या कालावधीत दुर्गा देवीची आरास करून तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आता नवरात्र म्हटलं की उपवास आलेच. त्याचप्रमाणे या कालावधीत लोक मांस, मासे किंवा मद्याचं सेवन करत नाहीत. तर, दिवस-रात्र देवीची पूजा करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशात अशीही काही मंदिरं आहेत जिथे देवीला चक्क मद्य आणि मांस नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं.
तुमचाही विश्वास बसत नसेल तर, या ठिकाण आम्ही तुम्हाला देशातील अशाच पाच मंदिरांबद्दल सांगणार आहोत जिथे देवीला मांस आणि मद्य अर्पण केलं जातं.
कोलकाताचे काली मंदिर (Kali Temple of Kolkata)
पौराणिक आख्यायिकेनुसार, या मंदिरात देवी सतीची बोटे पडली होती, असे मानले जाते. हे मंदिर शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे चटणी, पुलाव आणि खीरसह देवीला मांस अर्पण केले जाते.
उज्जैनचे गढकालिका मंदिर (Gadhkalika Temple of Ujjain)
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेले गडकालिका मंदिर हे महान कवी कालिदास यांचे कुलदैवत मानले जाते. या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून मद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
गुवाहाटीचे कामाख्या मंदिर (Kamakhya Temple of Guwahati)
गुवाहाटीचे कामाख्या हे मंदिर विशेषतः तंत्र-मंत्र अभ्यासासाठी ओळखले जाते. येथे मासे आणि मांस देखील देवीला अर्पण केले जाते.
गोरखपूरचे तारकुल्हा देवी मंदिर (Tarakulha Devi Temple of Gorakhpur)
गोरखपूरच्या तारकुल्हा देवी मंदिरातही मांसाहार दिला जातो. एवढेच नाही तर भक्तांना प्रसाद म्हणून मटणाचेही वाटप केले जाते.
ओरिसाचे विमला मंदिर (Vimala temple of Orissa)
ओरिसाच्या विमला मंदिरात दुर्गापूजेच्या वेळी मार्कंडा मंदिराच्या तलावातून पकडलेले मासे शिजवून देवी विमला देवीला अर्पण केले जातात. अशी इथळी प्रथा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: