Chaitra Amavasya 2024 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला फार महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या (Amavasya) आणि पौर्णिमा तिथी येते. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि अमावस्या येतात. पंचांगानुसार, चैत्र महिन्याची अमावस्या बुधवारी, म्हणजेच 8 मे रोजी आहे.
अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करुन पुण्य कमावलं जातं. अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्यं केली जातात. पूजा-पाठ केला जातो. परंतु, शास्त्रात अमावस्येच्या दिवशी काही कामं वर्ज्य सांगण्यात आली आहेत. ही कामं अमावस्येच्या रात्री अजिबात करू नये, जे लोक अशी कामं करतात त्यांना नशिबाची साथ मिळत नाही. अमावस्येच्या रात्री कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया. याआधी अमावस्येची तिथी आणि मुहूर्त पाहूया.
माघी अमावस्या प्रारंभ आणि समाप्ती वेळ
अमावस्या प्रारंभ : 7 मे रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटे
अमावस्या समाप्ती : 8 मे रोजी सकाळी 8 वाजून 51 मिनिटे
उदयातिथीनुसार, अमावस्या 8 मे रोजी असणार आहे.
अमावस्येच्या रात्री करू नका 'या' चुका
1. अमावस्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये. अमावस्येला नकारात्मक शक्तिंचा प्रभाव जास्त सक्रिय असतो, यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.
2. अमावस्येला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं.
3. अमावस्येला पती-पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं. गरुड पुराणानुसार, अमावस्येला स्थापित केलेल्या संबंधांमुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही.
4. अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घराच क्लेश करू नये, वाद घालू नये, यामुळे पितरं देवतांची कृपा लाभत नाही. अमावस्येला पितरांची पूजा करावी.
5. अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये. गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनि त्रास देतो. गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू-केतूचा अशुभ प्रभाव पडतो.
कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय
अमावास्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते. घरात आनंद, सुख-समृद्धी नांदते. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा. कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Magh Amavasya 2024 : माघी अमावस्या नेमकी कधी? आज की उद्या? योग्य तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या