Shekhar Suman Erotic Seen With Rekha :  अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) हे सध्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांच्या 'हिरामंडी' (Hiramandi) या वेब सीरीजनंतर चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांनी इरॉटिक सीन दिले आहेत. या वेब सीरिजमध्ये असलेला एक इरॉटिक सीन नियोजित नव्हता आणि तरीदेखील तो वन टेकमध्ये शूट करण्यात आला. 'हिरामंडी'च्या प्रमोशन दरम्यान शेखर सुमन यांनी आपल्या बोल्ड चित्रपटाचा उल्लेख केला. शेखर सुमन यांनी उत्सव या चित्रपटात काम केले होते. यामध्ये रेखा ही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या एका सीनसाठी दरम्यान शशी कपूर आणि गिरीश कर्नाड यांनी न्यूड होण्यास सांगितले. त्यावेळी मी रडलो असल्याचे शेखर सुमन यांनी सांगितले. 


अन् रडू कोसळले... 


संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही वेबसिरीज 1 मेपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे. त्यातील पात्रांनी अनेक मुलाखतींमध्ये मालिकेशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत. आता Honestly Podcast मध्ये शेखर सुमनने त्यांच्या उत्सव या चित्रपटाचा उल्लेख केला. 


शेखर सुमनने सांगितले की, 'शशी कपूर आणि गिरीश कर्नाड यांनी प्रँक केला होता. उत्सव एक इरॉटिक चित्रपट होता. एका सीनमध्ये त्यांनी मला लव्ह मेकिंग सीन दरम्यान मला न्यूड Butt (पार्श्वभाग) दाखवावा लागणार आहे. त्यांनी मला हा सीन सांगितल्यावर मला रडूच कोसळले. मी हा न्यूड सीन करू शकणार नाही असे सांगितले. त्यानंतर दोघेही हसू लागले आणि तुझ्यासोबत थट्टा करत असल्याचे सांगितले. 






शशी कपूर यांनी घेतली होती फिरकी... 


उत्सव चित्रपटाच्या वेळी अभिनेते शेखर सुमन खूपच तरुण होते. त्यांनी सांगितले की जेव्हा ते आपल्या मुलाला सेटवर घेऊन गेले तेव्हा शशी कपूर यांनी तो कोण आहे हे विचारले नाही तर विचारले की हे काय आहे? शेखरने जेव्हा त्याला एक मूल असल्याचे सांगितले तेव्हा त्याने सांगितले की, आधी त्याला लग्न झाले आहे यावर विश्वास बसत नव्हता आणि आता त्याला मूल असल्याचे सांगून आणखी एक सरप्राईज देत आहे. यानंतर शशी कपूर यांनी शेखर आणि त्यांच्या पत्नीला सर्वांसमोर उभे केले आणि  हसत म्हणाले, बघा, मुलांनी मुलाला जन्म दिला आहे.