Capricorn Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : राशीभविष्यानुसार, मकर राशीसाठी 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 हा आठवडा कमालीचा असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...


मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)


लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ताणतणाव जाणवू शकतो. संवादातून प्रश्न सोडवले जाऊ शकतात. प्रवासात असतानाही तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या संपर्कात राहण्याची गरज आहे. तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी कॉलवर तुमच्या जोडीदाराशी बोला. नात्यात किरकोळ वाद होऊ शकतात, पण ते सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही समस्येचं भांडणात रूपांतर होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या पालकांच्या संमतीने तुमच्या लग्नाचा अंतिम निर्णय देखील घेऊ शकता.


मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)


आठवड्याचा पहिला भाग फलदायी नसेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. नेमून दिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. कार्यालयीन राजकारण बाजूला ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा स्वभाव स्थिर ठेवा आणि तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय वाढवू पाहणारे उद्योजक आठवड्याच्या सुरुवातीला प्रयत्न करतील.


मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)


नवीन आठवड्यात तुमच्या हाती पैसा येईल. भविष्यासाठी बचत करणं हे तुमचं प्राधान्य असावं. या आठवड्यात तुम्हाला अनेक स्त्रोतांतून पैसे मिळू शकतात. ज्यांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनं खरेदी करायची आहे ते आठवड्याच्या शेवटी ते खरेदी करू शकतात. शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आठवड्याचा पहिला भाग चांगला आहे, तुम्हाला चांगला परतावा मिळेल. पण तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका.


मकर राशीचे आरोग्य  (Capricorn Health Horoscope)


तुमची काही औषधं सुरू असतील तर ती घ्यायला विसरू नका. वृद्धांनी जिने चढताना-उतरताना आणि बसमध्ये चढतानाही काळजी घ्यावी. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. त्याऐवजी आहारात पालेभाज्यांचा अधिक समावेश करा. दम्याच्या रुग्णांनी बाहेर प्रवास करताना काळजी घ्यावी. तुम्ही सहलीची योजना आखत असाल, तर तुमच्यासोबत मेडिकल किट असल्याची खात्री करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Sagittarius Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : 7 दिवसापर्यंत पैशाने भरलेली राहणार तिजोरी; धनु राशीला मिळणार भाग्याची साथ, वाचा साप्ताहिक राशीभविष्य