Travel : पावसाळा म्हटलं की आल्हाददायक वातावरण घेऊन येतो, ज्यामुळे निसर्ग बहरून जातो. अशा या रिमझिम पावसात फिरायला कोणाला आवडणार नाही? काही लोक असे असतात, जे Bachelor असून त्यांना स्वच्छंदी मनमोकळे फिरायला आवडते. विशेषत: अनेकांना पावसाळ्यात प्रवास करणे इतके आवडते की, ते कुटुंबीयांना न सांगता बाहेर पडतात. आणि पावसात प्रवासाची मजा आणखीनच वाढते, जेव्हा तुमच्यासोबत काही बॅचलर मित्र-मैत्रिणी असतात. हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहतो. तुम्हालाही बॅचलर ट्रिपला जायचे असेल आणि देशातील काही टॉप बॅचलर डेस्टिनेशन्स शोधत असाल, तर या लेखात आम्ही तुम्हाला देशातील काही टॉप बॅचलर डेस्टिनेशनबद्दल सांगणार आहोत.
नैनिताल
तुम्ही उत्तराखंडच्या निसर्गात वसलेले एक अद्भुत आणि आकर्षक बॅचलर डेस्टिनेशन शोधत असाल, तर तुम्ही नैनितालला पोहोचले पाहिजे. नैनिताल हे उत्तराखंडचे बेस्ट हिल स्टेशन मानले जाते. त्यामुळेच येथे सर्वाधिक पर्यटक येतात. पावसाळ्यात मित्रांसोबत इथे फिरण्यात एक वेगळीच मजा असते.
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नैनितालच्या या सुंदर निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. तुमच्या मनातील आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही मित्रांसोबत नाईट आउट करू शकता. हॉटेलच्या खोलीत तुम्ही रात्रीच्या पार्टीचा आनंदही घेऊ शकता. तुम्ही हातात स्पीकर घेऊन गाणं गाऊ शकता आणि नाचू शकता. नैनितालमध्ये तुम्ही नैनी लेक, नैना देवी, स्नो व्ह्यू पॉइंट आणि केव्ह गार्डन यासारखी अद्भुत ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
शिमला
हिमाचलच्या सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले शिमला हे असे हिल स्टेशन आहे, जिथे विवाहितांपासून ते बॅचलरपर्यंत सर्वजण भेटायला येतात. त्यामुळे शिमला हे देशातील टॉप हिल स्टेशनपैकी एक मानले जाते. येथील आल्हाददायक हवामानही पर्यटकांना आकर्षित करते.
पावसाळ्यात शिमलाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते, त्यामुळे फिरण्यासाठी पावसाळा हाही उत्तम काळ मानला जातो. येथील सुंदर दऱ्यांमध्ये तुम्ही बॅचलर पार्टीचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये रात्रभर पार्टी करू शकता. याशिवाय तुम्ही शिमल्यात रात्रीचा आनंद लुटू शकता. शिमल्यात तुम्ही जाखू मंदिर, द रिज, गांधी चौक आणि मॉल रोड सारखी अद्भुत ठिकाणे पाहू शकता.
उदयपूर
राजस्थानातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांचा विचार केला तर बरेच लोक प्रथम उदयपूरचे नाव घेतात. हे सुंदर शहर केवळ शाही आदरातिथ्यासाठीच नाही तर बॅचलर डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. हे तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
पावसाळ्यात मित्रांसोबत पार्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक उदयपूरला येतात. विशेषतः, अनेक लोक पावसाळ्यात उदयपूरच्या तलावांच्या ठिकाणी त्यांच्या स्वत:च्या शैलीत पार्टी करण्याचा आनंद घेतात. उदयपूरमधील अनेक हॉटेल्स, बार आणि रिसॉर्ट्समध्ये रात्रभर पार्ट्या सुरू असतात. येथे तुम्ही नाईट आऊटचा आनंदही घेऊ शकता.
हेही वाचा>>>
Women Travel : 'स्वतःसाठी सबुरी घे..तुझ्या रंगी रंगुनी घे!' निसर्गप्रेमी महिलांनो सोलो ट्रिपला निघताय? 'ही' Wildlife Destinations ठरतील योग्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )