Capricorn Weekly Horoscope 17 To 23 February 2025 : हिंदू कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तुमचा नवीन आठवडा मकर राशीसाठी नेमका कसा असेल? मकर राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत नवीन आठवडा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.


मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)


तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, जे लोक सिंगल आहेत ते लवकरच मिंगल होऊ शकतात. तुम्हाल तुमच्या पार्टनरमध्ये प्रेम आणि आत्मविश्वास दिसून येईल. हेच गुण तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतायत. तुमची मतं तुमच्या पार्टनरवर लादू नका. अन्यथा तुमच्या नात्यात लवकरच दुरावा निर्माण होऊ शकतो.


मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)


हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर तुमचे साहेब खुश होऊ शकतात. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ कुटुंबियांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमची कामं वेळेवर बिघडू शकतात.


मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्याकडून नकळतपणे पैसे खर्च होऊ शकतात. अशा वेळी तुमच्या पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्याकडे इतरांकडून पैसे उधारी घ्यावे लागतील.   


मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)


नवीन आठवड्यात तुमचा सकारात्मक दृष्टीकोन असणं फार गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी काम करा. घरात आल्यानंतर ऑफिसचे ताण  ऑफिसमध्ये ठेवा आणि कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवा. तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल. तसेच, नियमित योग, ध्यान, योगासन करा. सकस आहार तुमच्यासाठी हा काळ फार चांगला आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                        


Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य