Capricorn Horoscope Today 15 May 2023 : मकर राशीच्या लोकांना आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. मकर राशीच्या लोकांनी मोठ्या बहिणींशी संवाद साधताना बोलण्यात गोडवा ठेवावा. तुम्हाला तुमच्या प्रियकरासह आनंदाचे क्षण घालवता येतील. तुम्ही तुमच्या प्रियकराची कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता, जेणेकरून तुमच्या लग्नाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विद्यार्थी मनापासून अभ्यास करतील. जाणून घेऊया आजचे मकर राशीचे राशीभविष्य. 


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आरोग्याबाबत तुम्हांला काळजी घ्यावी लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार जाणवतील. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनातील तणावातून आराम मिळू शकतो.


वरिष्ठांचा सल्ला ठरु शकतो फायदेशीर


वरिष्ठ सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आज कुटुंबातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही योग्य आणि निश्चित पार पाडाल. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यास पालकांना खूप आनंद होईल. तुमच्या कामात यश मिळाल्यास तुम्ही आनंदी व्हाल. तुमचे उत्पन्न देखील वाढेल. चांगल्या प्रवासाची संधी तुम्हांला मिळेल मिळू शकते. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरु शकतो.


धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 


आज तुमचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हांला सहकार्य मिळेल. जुन्या ओळखीच्या आणि नातेवाईकांशी आज संपर्क होऊ शकतो. तसेच मुलांसोबत चांगला वेळ देखील तुम्ही आज घालवाल. 


आजचे मकर राशीचे आरोग्य 


आज मकर राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे.  तसेच तेलकट-मसालेदार अन्न टाळावे. तुम्हाला आज  तुमच्या खांद्यावर आणि पाठीत वेदना जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 


मकर राशीसाठी आजचे उपाय 


शंकराची पुजा करणे आज मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. 


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, 8 हा मकर राशीच्या लोकांसाठी शुभ अंक आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Scorpio Horoscope Today 14 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस लाभदायक; जाणून घ्या आजचे राशीभविष्य