Shiv Thakare In Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) गाजवण्यासाठी शिव ठाकरे (Shiv Thakare) सज्ज झाला आहे. 'बिग बॉस मराठी'चा विजेता आणि 'बिग बॉस 16'चा पहिला रनर-अप शिव ठाकरेने (Shiv Thakare) आता 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्याआधी आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शिव ठाकरे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आसपासच्या लोकांसोबत बोलताना, त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसून येतो. याला कारण त्याची आई आहे. याबद्दल स्पष्टीकरण देत शिव ठाकरे म्हणाला की,"बिग बॉस 16 जिंकल्यानंतर मी घरी आलो तेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक मला भेटायला यायचे आणि माझी आई त्यांना थांबून जेवून जाण्याचा आग्रह करायची".
शिव ठाकरे पुढे म्हणाला,"आमचं घर लहान होतं, ते माणसांनी भरलं होतं आणि त्यांना बसायला आणि खायला जागा नव्हती. पण माझ्या आईला सलाम की तिने खास टेम्पोची व्यवस्था केली होत आणि त्यांना त्यात बसून जेवायला लावलं. या सर्वांसाठी तिने स्वत: स्वयंपाक केला होता. जेव्हा मी तिला विचारले की, तू हे सर्व का करत आहेस? त्यावेळी ती म्हणाली की,"ज्यांनी नेहमीच तुला पाठिंबा दिला त्यांना कधीही विसरु नको आणि त्यांच्यासाठी योग्य वेळ काढत राहा".
आईबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला की,"माझ्या आईने मला नेहमीच मोठी स्वप्नं पाहायला शिकवले आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करायलादेखील सांगितलं आहे. फक्त लढ घाबरू नको, असा सल्ला आईने मला दिला आहे".
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने एमटीव्हीच्या 'रोडीज रायझिंग सीझन 14'मध्ये देखील भाग घेतला होता. अमरावती येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिव एक इंजिनियर आहे. 2019 मध्ये मराठी टेलिव्हिजनवर टाइम्स ऑफ इंडियाच्या टॉप 15 मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर होता.
शिव ठाकरे सध्या दक्षिण आफ्रिकेतील 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग करत आहेत. शिव ठाकरेने मराठी आणि हिंदी बिग बॉस चांगलच गाजवलं आहे. आता रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) माध्यमातून तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. शिवला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. 'खतरों के खिलाडी 13'मध्ये शिव ठाकरे उंचावरुन लटकताना, साप-मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहे. या खेळासाठी तो खूप उत्सुक आहे.
संबंधित बातम्या