Cancer Monthly Horoscope November 2023: कर्क (Cancer) राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर 2023 महिना (Cancer November 2023 Horoscope) सामान्य राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत हा महिना चांगला असला, तरी आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत राहू शकता. विद्यार्थ्यांसाठीही नोव्हेंबर महिना फारसा चांगला म्हणता येणार नाही. यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. प्रेम जीवनात पारदर्शकता ठेवा, अन्यथा ब्रेकअप देखील होऊ शकतो.


कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना कसा असेल? हे सविस्तरपणे जाणून घेऊया.


कर्क राशीचं नोव्हेंबरमधील व्यावसायिक जीवन


नोव्हेंबर महिन्यात व्यवसायात नवीन बदल घडवून आणता येतील. या महिन्यात कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संबंध आणि व्यवसायात अंतर राखणं योग्य राहील. रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना संमिश्र राहू शकतो. 16 नोव्हेंबरपासून तुमच्या व्यवसायात वाढ होऊ शकते, तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो.


कर्क राशीच्या नोकरदारांचं नोव्हेंबरमधील जीवन


नोकरीत प्रभुत्व मिळवण्यासाठी कठोर परिश्रम हाच पर्याय आहे. नोव्हेंबर महिन्यात नोकरी बदलण्याचा निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. तुम्हाला तुमचा जॉब पूर्णपणे बदलण्याची इच्छा असेल, परंतु या कल्पनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं कठीण जाईल. संपूर्ण महिना तुम्हाला नोकरीत परिपूर्णता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.


कर्क राशीचं नोव्हेंबरमधील कौटुंबिक जीवन


नोव्हेंबरमध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख नांदेल. प्रत्येक सुख-दु:खात जोडीदाराला साथ देणं तुमच्या वैवाहिक जीवनासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आईवडील तुमच्यामुळे खुश असतील. प्रेम जीवनात जोडीदारासोबत पूर्ण प्रामाणिकता, प्रेम आणि पारदर्शकता ठेवा, अन्यथा ब्रेकअप होऊ शकतो.


कर्क राशीच्या विद्यार्थ्यांचं नोव्हेंबरमधील जीवन


परदेशात शिक्षण घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात पंख मिळू शकतात. फक्त तुमचा उत्साह कायम ठेवा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मात्र हा महिना चांगला नाही, विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प किंवा काम पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी चांगलं वातावरण मिळणार नाही.


कर्क राशीचं नोव्हेंबरमधील आरोग्य आणि प्रवास जीवन


अपघात आणि आजार टाळण्यासाठी तुम्हाला या महिन्यात काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल. तुम्ही स्वत:च्या आरोग्यासाठी काही चांगल्या गोष्टी करू शकता. प्रवासादरम्यान या महिन्यात तुम्ही कमी खर्च करण्याचा प्रयत्न कराल.


कर्क राशीच्या लोकांसाठी उपाय



  • धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजेच 10 नोव्हेंबरला पिंपळाच्या झाडाजवळ पंचमुखी तेलाचा दिवा लावावा, यामुळे धनलाभ होऊ शकतो.

  • धनत्रयोदशीच्या दिवशी साखर, पांढरे वस्त्र आणि वाहन खरेदी करणं तुमच्यासाठी शुभ राहील. पण काळ्या वस्तू खरेदी करू नका.

  • 12 नोव्हेंबरला, म्हणजेच दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पंचमुखी तेलाचा दिवा लावा आणि देवी लक्ष्मीची आराधना करा, यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Gemini Monthly Horoscope November 2023: नोव्हेंबरमध्ये मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार; व्यवसायातही सावधतेची गरज, पाहा मासिक राशीभविष्य