Bigg Boss 17 Contestant Ankita Lokhande on Sushant Singh Rajput : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता कार्यक्रमातील नुकत्याच पार पडलेल्या भागात अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य केलं आहे.
अंकिता लोखंडेने 'बिग बॉस 17'च्या घरात सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर मौन सोडलं आहे. 'बिग बॉस 17'च्या मागच्या आठवड्यात विकी जैन (Vicky Jain) आणि ऐश्वर्या शर्माचं (Aishwarya Sharma) जोरदार भांडण झालं होतं. त्यावेळी सुशांत सिंह राजपूतसोबतच्या (Sushant Singh Rajput) ब्रेकअपबद्दल अंकिताने (Ankita Lokahnde) भाष्य केलं.
एका रात्रीत अंकिता लोखंडेचं आयुष्य बदललं
सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेचा खूप त्रास झाला होता. एका रात्री तिचं आयुष्य बदललं होतं. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,"सुशांतच्या जाण्याचा मला मोठा धक्का बसला होता. माझ्यासह माझ्या आई-वडिलांसाठीदेखील हे खूप धक्कादायक होतं. सुशांत सिंह राजपूत खरा कसा आहे हे लोकांना सांगण्याचा आजवर मी प्रयत्न केला आहे".
अंकिता पुढे म्हणाली,"सुशांतच्या निधनानंतर मला खूप ट्रोल केलं गेलं. सुशांतच्या आयुष्यात मी असते तर त्याने आत्महत्या केली नसती असं लोकांचं मत होतं. पण सुशांतने माझ्यासोबत ब्रेकअप केला त्यावेळी हे लोक कुठे होते? त्यामुळे माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, असं सुशांत सिंह राजपूतला या लोकांनी का नाही सांगितलं".
'या' कारणाने झाला अंकिता अन् सुशांतचा ब्रेकअप
ब्रेकअपबद्दल बोलताना अंकिता म्हणाली,"सुशांत आणि माझ्या ब्रेकअपचं विशेष असं कारण नाही. सुशांतने मला ब्रेकअपचं कारण सांगितलेलं नव्हतं. त्याने जर मला कारण सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी होती. कदाचीत त्यातून मार्ग काढता आला असता. पण त्यावेळी त्याचं करिअर खूपच चांगलं सुरू होतं. दरम्यान अनेकांना त्याचे कान भरले. पण अखेर निर्णय त्याचा होता. मी कोणत्या गोष्टीसाठी त्याला थांबवलं नाही".
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम केलं. या मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. जवळपास सात वर्ष ते रिलेशनमध्ये होते. पण 2016 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अंकिता विकी जैनला (Vicky Jain) डेट करू लागली. 2021 मध्ये ती विकीसोबत लग्नबंधनात अडकली.
संंबंधित बातम्या