Cancer Horoscope Today 23 February 2023 : कर्क आजचे राशीभविष्य, 23 फेब्रुवारी 2023: एखाद्याच्या सल्ल्याने तुमचे काम बिघडू शकते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढल्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. तुमचा दिवस संमिश्र जाईल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आज राशीपासून नवव्या भावात जात आहे, ज्यामुळे त्यांचे भाग्य मजबूत होईल.आज जर तुम्ही हुशारीने आणि कार्यक्षमतेने काम केले तर नशीबही तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय, घर आणि कुटुंबाच्या बाबतीत कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य



कर्क राशीचे आज करिअर
नोकरदार, व्यापारी आणि कर्क राशीच्या व्यावसायिकांनी आज काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे, अन्यथा धनहानी होऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात आज मौन पाळणे फायदेशीर ठरेल, वाद-विवाद टाळा. कामाच्या वेळी व्यवसायात काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी कोणत्याही प्रलोभने किंवा लाचेने प्रभावित होऊ नये, अन्यथा काही सरकारी त्रास होऊ शकतो. या राशीच्या नोकरदार लोकांनी आज ऑफिसमध्ये आपले काम काळजीपूर्वक करावे.


 


कर्क राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर, कर्क राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात सुख-शांती राहील आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराची किंवा मुलाची अचानक बिघडलेली तब्येत घरामध्ये तणाव निर्माण करू शकते. कुटुंबात धार्मिक कामे आयोजित करता येतील. मित्राच्या मदतीने आणि सल्ल्याने तुम्ही तुमचे काम नीट पार पाडू शकाल.



आज नशीब 72% तुमच्या बाजूने
कर्क राशीचे लोक आज स्वतःमध्ये काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतील. आज तुमच्या विचार आणि कार्यपद्धतीत काही बदल होईल. तुम्ही एखाद्याला मदत कराल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कर्क राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी अनुभवी आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आज तुम्ही आर्थिक बाबतीत खूप संयमी राहाल आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर, तुम्हाला नफा मिळेल. आज या राशीच्या लोकांना भेटवस्तूही मिळू शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने असेल. भगवान शिवाला अभिषेक केलेला लाभदायक ठरेल.



आज कर्क राशीचे आरोग्य
कर्क राशीच्या लोकांना मूळव्याध इत्यादी समस्या असू शकतात. हलका आहार घेणे फायदेशीर ठरेल.



कर्क राशीसाठी आजचे उपाय
तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी एक नाणे, एक उसाची कांडी आणि सात अख्खे हळकुंड एका पिवळ्या कपड्यात बांधा आणि रेल्वे लाईनजवळ फेकून द्या, मग मंदिरात जा.



शुभ रंग- नारिंगी
शुभ अंक- 4


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Gemini Horoscope Today 23 February 2023: मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य तुमच्या सोबत राहील, कौटुंबिक साथ मिळेल, राशीभविष्य जाणून घ्या