Budhaditya Yog 2025 : आज कार्तिक अमावस्येबरोबरच गुरुवारचा शुभ दिवस आहे. पंचांगानुसार, अमावस्या तिथी दुपारी 12 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी सुरु होईल. त्याचबरोबर, विशाखा, अनुराधा नक्षत्रासह शोभन, सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आज सूर्य आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे बुधादित्य योग (Budhaditya Yog) निर्माण होईल. या योगाचा अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे. त्यामुळे या लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
आज मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या कामकाजात तुम्ही नवीन योजनांचा लाभ घेऊ शकता. तसेच, घाईगडबडीत कोणताही निर्णय न घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमची अनेक कामे सहज साध्य करता येतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी देखील आजचा दिवस मानसिक शांती आणि स्थिरतेचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, प्रेम जीवनात गोडवा टिकून राहील. वाणीत गोडवा ठेवा.
कर्क रास (Cancer Horoscope)
आज तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला मनासारखं यश मिळेल. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, मित्र-परिवाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅन करु शकता. उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. नातेवाईकांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिंह रास (Leo Horoscope)
तुमच्यासाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. सरकारी योजनांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, नवीन कलात्मक गोष्टींचा तुम्हाला अनुभव घेता येईल. वाणीत तुमच्या मधुरता हवी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :